Amritpal Singh : अमृतपाल सिंगचे महत्त्वपूर्ण सीसीटीव्ही फुटेज आले समोर! जालंधरमधील गावात...

Amritpal Singh'
Amritpal Singh'

नवी दिल्ली - अमृतपाल सिंह यांच्या शोधासाठी अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. पंजाब पोलीस शनिवारपासून अमृतपालचा शोध घेत आहेत. अमृतपाल सिंग, याच्यामुळे पंजाबचं राजकारण ढवळून निघालं आहे.

Amritpal Singh'
हद्दच झाली! 'सर्वोत्तम अभियंता', म्हणत SDO ने कार्यालयात लावला ओसामा बिन लादेनचा फोटो; कारवाईत...

दरम्यान अमृतपाल सिंगचे एका गावातील फुटेज समोर आले आहे, याबाबत गावकऱ्यांनी दावा केला आहे. जालंधर गावातील स्थानिकांचा दावा आहे की खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग 18 मार्च रोजी त्यांच्या गावात उपस्थित होता. जालंधरमधील स्थानिक ग्रामस्थांकडून सीसीटीव्ही व्हिडिओ सादर करण्यात आले आहे. मात्र पंजाब पोलिसांनी याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

अमृतपाल सिंग पळून गेल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला फटकारले. आपल्याकडे ८० हजार पोलिस आहेत, तरीही तुम्ही अमृतपालला अटक का करू शकला नाहीत, असा सवाल हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पंजाबचे महाधिवक्ता विनोद घई यांना केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com