
आधुनिक युगातील 11 वर्षाच्या श्रावणबाळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्स मुलाच्या जिद्दीला आणि उत्साहाला सलाम करत आहेत. लॉकडाऊनदरम्यान अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
वारानशी (उत्तर प्रदेश): आधुनिक युगातील 11 वर्षाच्या श्रावणबाळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्स मुलाच्या जिद्दीला आणि उत्साहाला सलाम करत आहेत. लॉकडाऊनदरम्यान अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
Video: या लहानग्याची काय चूक हो?
जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले असून, रोजगार बंद झाल्यामुळे अनेकांचे हाल होताना दिसतात. रोजगार बंद झाल्यामुळे अनेकजण आपल्या घरी परतू लागले आहेत. पण, प्रवासादरम्यान त्यांचे हाल होताना दिसतात. काळीज पिळवटावून टाकणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Video: भूकेपोटी मजूर अक्षरशः तुटून पडले...
तवारे आलम हा 11 वर्षाचा मुलगा आपल्या आईवडिलांना सायकल रिक्षामध्ये बसवून सायकल चालवत आहेत. बनारस वरून ते बिहारकडे निघाले आहेत. वडील रिक्षा चालवून थकल्यानंतर मुलगा रिक्षा चालवायला घेतो. आई-वडीलांना सायकल रिक्षात बसून तो चालवताना दिसत आहे. प्रवासादरम्यान हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला असून, रामलखन यादव यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. श्रावण बाळाने कावडीमधून आई-वडिलांना नेले होते. अगदी त्याचप्रमाणे तवारे आलम हा आपल्या आई-वडिलांना रिक्षातून नेत आहे. संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण हळहळत आहेत. शिवाय, मुलाच्या या जिद्दीला आणि उत्साहाला सलाम ठोकत आहेत.
आज का श्रवण कुमार #तवारे_आलम जिसकी उम्र 11 बर्ष है। बनारस से अपने माँ बाप के साथ रिक्शे से ही अररिया बिहार के लिए निकला है।
पिता जी जब थक जाते हैं। तो खुद रिक्शा चलाता है। @umashankarsingh @vinodkapri @PJkanojia @jyotiyadaav @DeepikaSRajawat pic.twitter.com/HWyUEOLGps
— Ramlakhan Yadav (@RamlakhanSp) May 14, 2020