Video: भूकेपोटी मजूर अक्षरशः तुटून पडले...

वृत्तसंस्था
Thursday, 14 May 2020

बिहारच्या कटिहार स्थानकात बिस्कीटांच्या पुड्यासाठी झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून परिस्थितीची जाणीव होत आहे, अशा प्रतिक्रिया देत नेटिझन्स व्यक्त होत आहेत.

कटिहार (बिहार) : बिहारच्या कटिहार स्थानकात बिस्कीटांच्या पुड्यासाठी झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून परिस्थितीची जाणीव होत आहे, अशा प्रतिक्रिया देत नेटिझन्स व्यक्त होत आहेत.

Video: या लहानग्याची काय चूक हो?

कटिहार स्थानकाबाहेर रेल्वे थांबली होती. यावेळी त्यांना खाण्यासाठी बिस्कीटांच्या पुड्यांचे वाटप करण्यात येणार होते. पण, ते करण्यापूर्वीच या पिशवीवर मजूर तुटून पडले आणि पिशवी ओढू लागले. काहींना बिस्कीटाचे पुडे मिळाले तर काहीजण जोरजोरात पिशवी ओढण्याचा प्रयत्न करत होते. शिवाय, एकमेकांच्या हातातले बिस्कीटाचे पुडे खेचून घेण्यासाठी झटापट सुरू होती. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर भूक म्हणजे काय असते? हे जाणवू लागते. काही दिवसांपूर्वी असा प्रकार कल्याणहून निघालेल्या एका मजूरांच्या रेल्वेमध्ये घडला होता. गुरुवारी पुन्हा एकदा हा प्रकार बिहारमध्ये घडला आहे. भुकलेल्या मजुरांची ही अवस्था पाहून अंगावर काटा उभा राहात आहे.

अन् त्याने 800 किलोमीटर ओढली दोरी...

दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले असून, रोजगार बंद झाल्यामुळे अनेकांचे हाल होताना दिसतात. काळीज पिळवटावून टाकणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेकजण घरी परताना दिसत असून, हाल होत आहेत.

काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ आणि बातमी वाचाच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown fighting between laborers for biscuits in bihar video viral