आसामचे मळे पुन्हा बहरले; सोशल डिस्टिन्सिंगची अंमलबजावणी 

पीटीआय
शुक्रवार, 22 मे 2020

चौथ्या लॉकडाउनच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार आसाममधील शेतीकामास परवानगी दिल्याने चहामळ्यात मजूर पुन्हा कामावर आल्याचे चित्र दिसत आहे.मजुरांना सॅनेटायजर आणि मास्क पुरवण्यात आले आहेत.

दिब्रुगड - कोविडच्या प्रसारामुळे उद्योग व्यवसाय आणि शेतीकामे ठप्प राहिल्याने दीड ते दोन महिन्यापासून मजुरांची आणि कामगारांची परवड सुरू होती. परंतु आता तिसऱ्या आणि चौथ्या लॉकडाउनच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार आसाममधील शेतीकामास परवानगी दिल्याने चहामळ्यात मजूर पुन्हा कामावर आल्याचे चित्र दिसत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सरकारच्या सूचनांनुसार सोशल डिस्टिन्सिगंची अंमलबजावणी करत मजूर काम करत असल्याचे मनोहरी टी इस्टेटचे मॅनेजर राकेश मिश्रा यांनी सांगितले. मजुरांना सॅनेटायजर आणि मास्क पुरवण्यात आले आहेत. यासंदर्भात शिक्षक, आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मजूर आणि कामगारवर्गात जनजागृती करण्यात आली असून चहामळ्यालगतच्या निवासी भागात संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. सॅनेटायजेशन पथकाचे कर्मचारी देबरू यांनी दिलेल्या माहितीनुसार, चहा निर्मितीचा कारखाना आणि परिसरात स्वच्छता केली जात असून कोविडला प्रतिबंध करण्यासाठी सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या साधनांचा वापर केला जात आहे. याशिवाय नियमितपणे कारखाना सॅनेटाइज केला जात असल्याचेही ते म्हणाले. सरकारच्या मदतीने कंपनीचे अधिकारी देखील कारखाना आणि परिसरात कोविड प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक चहा उत्पादकांनी काम करण्यास सुरवात केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पाचशे कोटींचे नुकसान 
कोविडच्या प्रसारामुळे आणि लॉकडाउनमुळे आसाममधील चहा उत्पादकांना सुमारे ५०० कोटीहून अधिक नुकसान सोसावे लागले आहे. चहानिर्मिती हा आसामचा सर्वात मोठा उद्योग असल्याने राज्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. भारतात २०१९ मध्ये चहाचे एकूण उत्पादन १३८९.७० दशलक्ष किलो झाले. त्यापैकी आसामच्या ७१५.४९ दशलक्ष किलोचा समावेश होता. भारतातील एकूण उत्पादनापैकी आसामच्या उत्पादनाचा वाटा हा ५१.५१ टक्के होता. लॉकडाउनच्या काळात लहान मोठे चहा निर्माते मिळून त्यांच्या उत्पादनात अंदाजे ३.२ कोटी किलोची घट झाली आहे. त्याची किंमत सुमारे ५०० कोटी रुपये इतकी आहे. 

कोकणातून दोन लाखाहून अधिक पेटी हापूस महाराष्ट्रासह परराज्यात

मोठे उत्पादक  - ७८३ 
कामगारांची संख्या  -  ७.३३ लाख 
लहान उत्पादक  - १.१८ लाख 
कामगारांची संख्या - ३ लाख 

सरकारकडून सवलत 
लॉकडाउनमुळे संभाव्य नुकसानीचा सामना करण्यासाठी सरकारने किमान निश्‍चित शूल्कपासून चहा उत्पादकांना सवलत दिली आहे. राज्यात टप्याटप्याने चहामळ्यात काम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याप्रमाणे राज्यातील सर्वच ७८३ मोठे आणि १.१८ लाख लहान चहा उत्पादकांना काम सुरू करण्याची मूभा देण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील पाचशेहून अधिक चहा कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. चहामळ्यात सोशल डिस्टिन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी चहामळ्यांना नियमित भेटी देत आहेत. 

टोमॅटोवर कोणताही अज्ञात व्हायरस नाही; बंगळूरच्या संस्थेकडून शास्त्रीय निदान

आसाम चहा महामंडळाचे कारखाने सुरू 
आसाम चहा महामंडळाचे (एटीसीएल) सर्व पंधरा मळे आणि कारखान्यांना संपूर्ण क्षमतेने काम करण्याची परवानगी दिली आहे. एटीसीएलचे सर्व १६ हजाराहून अधिक मजूर आणि कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन देण्यात आल्याचे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown 4.0 Workers at a tea farming in Assam seen to be back to work