esakal | लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या पाच वर्षाच्या मुलाने ठरवले अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown 5 yr old come alone domestic flight delhi bengaluru meet mother

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान पाच वर्षांचा मुलगा तीन महिन्यांपासून आई-वडिलांपासून दूर होता. त्याने घरी जायचे ठरवले आणि एकट्याने विमान प्रवास करून घर गाठले. विहान शर्मा असे या मुलाचे नाव आहे.

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या पाच वर्षाच्या मुलाने ठरवले अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान पाच वर्षांचा मुलगा तीन महिन्यांपासून आई-वडिलांपासून दूर होता. त्याने घरी जायचे ठरवले आणि एकट्याने विमान प्रवास करून घर गाठले. विहान शर्मा असे या मुलाचे नाव आहे.

नवरी म्हणाली; काही झालं तरी लग्न करणारचं अन्...

देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. पण, चौथ्या टप्प्यामध्ये लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता आणत देशातंर्गत विमान वाहतूक सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक जण आपापल्या घरी परतताना दिसत आहेत. विहान गेल्या तीन महिन्यांपासून दिल्ली येथे आपल्या आजोबांच्या घरी अडकून पडला होता. कर्नाटकमध्ये राहणाऱया आई-वडिलांकडे त्याला जायचे होते, पण जाता येत नव्हते. विमान प्रवास सुरू झाल्यानंतर त्याने घरी जायचे ठरवले.

कोरोनाची 'एक्सपायरी डेट' ठरली...

विहानने दिल्ली ते बंगळुरू एकट्याने विमान प्रवास केला. बंगळुरु विमानतळावर त्याला घेण्यासाठी त्याची आई आली होती. विमानतळावर पोहचल्यानंतर तब्बल ३ महिन्यांनी आई-मुलाची भेट झाली. पण, त्यावेळी आईने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुलाची गळाभेट घेणे टाळले. पण, विहानला पाहिल्यावर डोळ्यात अश्रू आले आणि त्याच्या धाडसाचे कौतुकही केले.

loading image
go to top