Video : गळा दाबला, वर्दी फाडली; जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला ठाणेदार!

वृत्तसंस्था
शनिवार, 4 एप्रिल 2020

ठाणेदार पांड्ये यांच्यावर जीवघेणा हल्ला, मारहाण, धमकी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी २५ जणांविरोधात दखलपात्र आणि ५० अज्ञात व्यक्तींविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कनौज : उत्तर प्रदेशच्या कनौज जिल्ह्यात शुक्रवारी (ता.३) नमाज पढण्यासाठी जमा झालेल्या टोळक्याने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली. तसेच या जमावाला हटविणाऱ्या पोलिसाचा गळा दाबण्याचा प्रकारही याठिकाणी घडला.

संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतरही लोक मोठ्या संख्येत एकाजागी जमा होत आहेत. आणि दुसरीकडे आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कजियाना भागात पोलिसांवर हल्ला करण्याचा डाव अगोदरच आखण्यात आला होता. सामुहिक नमाज अदा करताना जर पोलिस आले तर त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी अगोदरच विटांचे तुकडे आणि दगड लोकांनी आपल्या घराच्या छतांवर साठवून ठेवले होते. पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर त्या भागाची ड्रोनद्वारे पाहणी करण्यात आली. त्यामध्ये हे धक्कादायक चित्र समोर आल्याचे 'एनबीटी'ने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.  

- चीनने पाकला लावला चुना; अंडरवेअरपासून बनवलेल्या मास्कचा केला पुरवठा

हेड कॉन्स्टेबल असलेल्या राजवीर यांना एका घरातून लोकांचा आवाज ऐकू आला. त्यामुळे घराबाहेर बसलेल्या काही महिलांजवळ त्यांनी याबाबत चौकशी केली. तेव्हा त्यांनी माहिती देण्यास विरोध केला. त्यानंतर राजवीर यांनी तेथील स्थानिक पोलिस चौकीत याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी लगेच त्याठिकाणी धाव घेतली आणि लोकांना सूचना केल्या. तेवढ्यात पोलिसांवर चोहोकडून दगडफेक होऊ लागली. 

- मोठी बातमी - "अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत" : राज ठाकरे

हल्ल्याची माहिती मिळताच डीएम राकेश कुमार मिश्र, एसपी अमरेंद्र प्रसाद सिंह, एडीएम गजेंद्र सिंह, एसडीएम शैलेश कुमार, सिटी सीओ श्रीकांत प्रजापती, अॅडिशनल एसपी विनोद कुमार, कोतवाल नागेंद्र पाठक हे पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिस येत असल्याची माहिती घराबाहेर बसलेल्या महिलांनी दिल्यावर हल्लेखोर घरात घुसले. 

- मोठी बातमी ! ठाकरे सरकार काढणार 60 हजार कोटींचे कर्ज

ठाणेदार थोडक्यात बचावला

हल्लेखोरांचे टोळके जमा होत असताना तेथे गेलेल्या ठाणेदार आनंद पांड्ये यांच्यावर सुरवातीला जमावाने हल्ला केला. पांड्ये यांचा गळा दाबला तसेच त्यांचे कपडेही फाडले. हल्लेखोरांपासून कशीबशी सुटका करून घेतल्याने पांड्ये थोडक्यात बचावले. 

७५ जणांविरोधात एफआयआर दाखल

ठाणेदार पांड्ये यांच्यावर जीवघेणा हल्ला, मारहाण, धमकी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी २५ जणांविरोधात दखलपात्र आणि ५० अज्ञात व्यक्तींविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ११ हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य हल्लेखोरांचा तपास सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown crowd attacks on police inspector in Kannauj