चीनने पाकला लावला चुना; अंडरवेअरपासून बनवलेल्या मास्कचा केला पुरवठा

China-Pak
China-Pak

इस्लामाबाद : कोरोना व्हायरसने पाकिस्तान भोवतीचा विळखा घट्ट करण्यास सुरवात केली आहे. दिवसेंदिवस तेथील रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत पाकच्या डोकेदुखीत आणखी भर पडणारी घटना घडली आहे.

पाकिस्तान आणि चीनमधील दोस्ताना जगाला माहित आहे. पण या मैत्रीच्या नात्याचा गैरफायदा चीनने उचलला आहे. चीनने पाकिस्तानची फसवणूक केली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक तेवढी सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचा वादा चीनने केला होता. त्यानुसार चीनने पाकिस्तानला आरोग्य संरक्षण साहित्य पाठविण्यास सुरवात केली. मात्र, चीनने एन-९५ मास्क ऐवजी अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाकमध्ये पाठवून दिले. महत्त्वाची गोष्ट ही की युरोपीय देशांनाही चीनने हलक्या आणि निकृष्ट दर्जाचे मास्क पुरविले होते. स्पेन आणि नेदरलँड या देशांनी आलेला माल पुन्हा चीनकडे पाठविला आहे.

पाकचे पंतप्रधान इम्रान खान हे आपल्या प्रत्येक भाषणात चीनचे गुणगान गात असतात. कोरोनाविरुद्धच्या लढाईत चीन सोबत असल्याने त्यांची हिंमत वाढली होती. मात्र, चीनने आपल्या कृतीद्वारे पाकला चांगलाच चुना लावला आहे. चीनने पाठविलेले मास्क उघडून पाहिल्यानंतर पाकमधील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी हैरान झाले होते. आणि धक्कादायक बाब म्हणजे सिंध प्रांत सरकारने कोणतीही चौकशी न करता हा सर्व माल हॉस्पिटलकडे पाठवून दिला होता.

मेडिकल वस्तूंची वाहतूक करण्यासाठी गिलगिट-बाल्टीस्तानला जोडणारी सीमा खोलण्याची मागणी चीनने केली होती. चिनी दुतावासातर्फे पाकच्या विदेश मंत्रालयाला निवेदन पाठविण्यात आले होते. त्यामध्ये शिजियांग प्रांतातून पाकिस्तानमध्ये मेडिकल वस्तूंची वाहतूक केली जाणार असल्याचा उल्लेख करण्यात आला होता, अशी माहिती पाकच्या वृत्तसंस्थांनी दिली आहे. 

२ लाख साधे मास्क, २ हजार एन-९५ मास्क, ५ व्हेंटिलेटर आणि २ हजार टेस्टिंग किट ही मदत सुरवातीला पाठवून देण्यात येईल, असे पाकच्या विदेश मंत्रालयाला पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, मास्क व्यतिरिक्त इतर कोणत्या वस्तूंमध्ये कमतरता आढळल्याबाबत पाकने स्पष्टीकरण दिलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com