esakal | नवरदेव वाजत-गाजत आला नवरीच्या दारात पण...
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown girl marry boyfriend after denied groom jhansi at up

लॉकडाऊनदरम्यान नवरदेवर वरात घेऊन नवरीच्या दारात आला होता. नवरीने त्या क्षणी पोलिसांना फोन केला आणि विवाहास नकार देत थेट प्रियकरासोबत विवाह केला. उत्तर प्रदेशात या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

नवरदेव वाजत-गाजत आला नवरीच्या दारात पण...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

झांशी (उत्तर प्रदेश): लॉकडाऊनदरम्यान नवरदेवर वरात घेऊन नवरीच्या दारात आला होता. नवरीने त्या क्षणी पोलिसांना फोन केला आणि विवाहास नकार देत थेट प्रियकरासोबत विवाह केला. उत्तर प्रदेशात या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पत्नीचे छायाचित्र अन् मोबाईल नंबर केला व्हायरल...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, धवाकर गावातील मुलीसोबत मडवा गावातील मुलाचा विवाह ठरला होता. विवाहाच्या दिवशी नवरदेव नातेवाईकांसह नवरीच्या गावात पोहचला. पण, नवरीला हा विवाह मान्य नव्हता. नवरीने वरात आल्याचे पाहिल्यानंतर पोलिसांना फोन केला. काही वेळातच लहचूरा पोलिस ठाण्यातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मुलीने आपल्याला हा विवाह मान्य नसल्याचे सांगितले. तिच्या कुटुंबियांनी सुद्धा समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण, ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. काही वेळातच तिचा प्रियकर दाखल झाला. नवरीने आपल्याला प्रियकरासोबत विवाह करायचे असल्याचे सांगितले. यामुळे दोन्ही बाजूकडील कुटुंबिय गोंधळून गेले. शिवाय, घटनास्थळी पोलिस उपस्थित होते. मुलगी सज्ञान असल्यामुळे विवाह कोणासोबत करायचा हे तिच्यावर अवलंबून होते.

तिसरा विवाह करून आल्याचे पत्नीने पाहिले अन्...

दरम्यान, काही वेळानंतर नवरदेवाने आपल्या नातेवाईकांना बाजूला घेऊन परत जाण्याचे ठरवले व याबाबत मुलीच्या नातेवाईकांनाही सांगितले. नवरदेव गेल्यानंतर मुलीने प्रियकरासोबत मंदिरात जाऊन विवाह केला. विवाहानंतर ग्रामस्थांनी नवदांपत्यांना आशीर्वाद दिले. पण, या विवाहाची परिरात चर्चा रंगली आहे.

loading image
go to top