esakal | Video: पत्नी माझ्याशी भांडली हो म्हणून...
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown husband tries jump from balcony afte fight with wife over lunch

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असल्यामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंची कमतरता आहे. पत्नीने आवडती भाजी केली नाही म्हणून भांडणानंतर एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला.

Video: पत्नी माझ्याशी भांडली हो म्हणून...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अहमदाबाद (गुजरात): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असल्यामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंची कमतरता आहे. पत्नीने आवडती भाजी केली नाही म्हणून भांडणानंतर एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने यात तो बचावला आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

...म्हणून चोरली सायकल; माफीनामा व्हायरल

अहमदाबादमधील चांदखेडा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे त्याच्या पत्नीशी भाजीवरून भांडण झाले. दोघांमध्ये बराच वेळ भांडण सुरू होते. त्यानंतर पतीने थेट बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने शेजारील नागिरकांनी त्याला पाहिल्यामुळे आरडाओरड सुरू केली. पत्नी माझ्याशी भांडली हो, म्हणून रडत होता. नागरिक पळत आले आणि पतीची समजूत काढून घरात ओढून घेतले.

Video: आधुनिक युगातील 11 वर्षाचा श्रावणबाळ...

दरम्यान, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून टीका केली आहे. कोरोनामुळे मानसिक संतुलन बिघडले की काय? ही व्यक्ती तारक मेहता आहे का? अशा प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

loading image