...म्हणून चोरली सायकल; माफीनामा व्हायरल

वृत्तसंस्था
Monday, 18 May 2020

कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेकजण विविध ठिकाणी अडकले आहेत. घरी परतण्यासाठी विविध मार्ग परतताना दिसतात. एका व्यक्तीने घरी जाण्यासाठी सायकलची चोरी केली आहे.

जयपूर (राजस्थान) : कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेकजण विविध ठिकाणी अडकले आहेत. घरी परतण्यासाठी विविध मार्ग परतताना दिसतात. एका व्यक्तीने घरी जाण्यासाठी सायकलची चोरी केली आहे. पण, चोरी करण्यापूर्वी माफीनामा लिहून ठेवला आहे. संबंधित माफीनामा सोशल मीडियावर व्हायरल झला आहे.

Video: आधुनिक युगातील 11 वर्षाचा श्रावणबाळ...

लॉकडाऊनमध्ये प्रवासी मजुरांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. काम बंद असल्यामुळे जवळ पैसे नाहीत आणि त्यामुळे खाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे गावी जाण्यासाठी मजुर जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. लहानमुलांसह अनेकजण हजारो किलोमीटर चालत निघालेले चित्र देशभरात पाहायला मिळत आहे. प्रवासादरम्यान अनेकांना जीव गमवावा लागत आहे. पण, प्रत्येकजण घरी परतण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

द ग्रेट खली करतोय गवंडीकाम अन् तळतोय भजी...

एका मजुराने गावी जाण्यासाठी सायकलची चोरी केली. पण, चोरी का करत आहे, यामागचे कारणही लिहीले आहे. संबंधित कारण वाचल्यानंतर अनेकांना वाईटही वाटत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारी चिठ्ठी भरतपूर येथील असल्याचे समजते. उत्तर प्रदेशातील बरेली येथे राहणाऱ्या मजुराला त्याच्या मुलासह घरी जायचे होते. पण, जाण्यासाठी काही व्यवस्था नसल्यामुळे त्याने सायकलची चोरी केली आणि मालकासाठी पत्र लिहून ठेवले आहे.

Video: भूकेपोटी मजूर अक्षरशः तुटून पडले...

चिठ्ठीत लिहीले की..
'नमस्कार.. मी तुमची सायकल घेऊन जातोय. शक्य झालं तर मला माफ करा. कारण माझ्याकडे कोणतेच वाहन नाही. माझा एक मुलगा आहे, त्याच्यासाठी मला हे करावे लागले. तो दिव्यांग आहे आणि चालू शकत नाही. आम्हाला बरेलीला जायचे आहे. तुमचाच मजबूर मजदूर'

चिठ्ठीत त्या व्यक्तीने मोहम्मद इकबाल असे स्वत:चे नाव लिहिले आहे. सोमवारी उशिरा रात्री भरतपूर जिल्ह्यातील रारह गावातल्या साहब सिंग यांच्या घरात त्याने सायकल चोरी केली. सिंग यांना दुसऱ्या दिवशी सकाळी घराच्या अंगणात ही चिठ्ठी सापडली.

Video: या लहानग्याची काय चूक हो?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown migrant worker stole cycle write letter to owner