esakal | दिल्लीत आठवडाभराचा कडक लॉकडाउन, सोमवारपर्यंत राजधानी राहणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

दिल्लीत आठवडाभराचा कडक लॉकडाउन, सोमवारपर्यंत राजधानी बंद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये आता जागा शिल्लक नाही. भविष्यात आरोग्य व्यवस्था कोलमडल्यास मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. त्यापूर्वीच आम्हाला हे मोठे पाऊल उचलावे लागल्याचे असल्याचे ते म्हणाले. नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यानंतर सरकारला लॉकडाऊनसारखे पाऊल उचलावे लागणार असल्याची जाणीव झाली, असे केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लीवासियांनी लॉकडाऊनचे कठोरपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कोरोनाच्या नव्या लाटेनंतर राज्यातील परिस्थिती बिघडत चालल्याने मुख्यमंत्री केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत अनेक उच्चस्तरीय अधिकारीही सहभागी झाले होते. या बैठकीतच पुढील सात दिवसांसाठी 24 तास संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते बैठकीनंतर अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले. ते पुढीलप्रमाणे...

- रात्री 10 पासून पुढील सोमवारच्या पहाटे 5 पर्यंत सहा दिवस दिल्लीत लॉकडाऊन सुरु राहील. यादरम्यान, केवळ अत्यावश्यक सेवार सुरु राहतील. 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभही होईल. लोकांनी लॉकडाऊनचे पालन करावे, घराबाहेर पडू नये.

हेही वाचा: महाराष्ट्रात कोरोनाचं तांडव, प्रत्येक तीन मिनिटाला एकाचा बळी

- प्रति 10 लाख टेस्टच्या हिशोबाने दिल्लीत जगात सर्वाधिक टेस्ट होत आहेत. आम्ही रुग्ण संख्या कमी करुन दाखवली आहे. त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाणही कमी करुन दाखवले आहे. आम्ही प्रामाणिकपणे सर्व गोष्टी सांगितल्या.

हेही वाचा: 'देशात युद्धासारखी स्थिती...' संजय राऊतांनी केली मोठी मागणी

- तीन-चार दिवसांत 25 हजारांच्या आसपास रुग्ण वाढले. पॉझिटिव्हीटी रेट वाढला आहे. दिल्लीत बेडची कमतरता भासत आहे. आयसीयू बेड जवळपास संपुष्टात आले आहेत. ऑक्सिजनही संपण्याच्या स्थितीत आले आहेत. औषधांची कमतरता भासत आहे. विशेषतः रेमेडिसिविरचा समावेश आहे. हे सर्व आम्ही तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगत नाही. पुढे काय करावे याच्या चर्चेसाठी आम्ही सांगत आहोत.

हेही वाचा: 'व्हेंटिलेटरपेक्षा मास्क बरा'; अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला फंडा!

- सहा दिवसांचा खूप छोटा लॉकडाऊन आहे. कामगारांनी दिल्ली सोडून जाऊ नये, असे आवाहन मी त्यांना करतो. त्यांची पूर्णपणे मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करु, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

दरम्यान, दिल्लीत मागील 24 तासांत 161 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच्या एक दिवस आधी कोविड-19 चे 24375 नवे रुग्ण समोर आले होते. तर 167 जणआंचा मृत्यू झाला होता. दिल्लीत बाधितांची संख्या 8,53,460 इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या 12,121 इतकी झाली आहे.