अर्थसंकल्पानंतर लोकसभा तहकूब

वृत्तसंस्था
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आज (बुधवार) लोकसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. सभागृहाचे कामकाज शुक्रवारी सकाळी 11 वाजता सुरू होईल असे लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितले. 
 
तत्पूर्वी, माजी केंद्रीय मंत्री व खासदार ई. अहमद यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली म्हणून गुरुवारी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात येईल असे महाजन यांनी जाहीर केले होते. 

अर्थमंत्री जेटली यांनी त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपवून अर्थविधेयक संसदेसमोर विचारार्थ मांडल्यानंतर बाकांवर हात आपटत सर्वांनी त्याचे स्वागत केले. 
 
Web Title: Lok Sabha adjourned for the day after Arun Jaitley concludes Budget speech