70 वर्षे काय केलंत? पिढ्यानपिढ्या राज्य करणाऱ्यांनीही उत्तर द्यावं - अमित शहा

टीम ई सकाळ
Saturday, 13 February 2021

काश्मीरमधून कलम 370 हटवून काय झालं असा प्रश्न मोदी सरकारला विचारला.

नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत बजेटच्या चर्चेवर उत्तर दिलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांवर जोरात हल्लाबोल केला. यात त्यांनी काश्मीर मुद्यावरून काँग्रेसवर अनेक आरोप केले. 

अमित शहा म्हणाले की, कलम 370 हटवण्याच्यावेळी जी वचने दिली ती पूर्ण केली नाही असा आरोप केला गेला. त्याचं काय झालं असं विरोधकांनी विचारलं. पण कलम 370 वर 17 महिने झालेत फक्त. तुम्ही 70 वर्षे काय केलंत त्याचा हिशोब घेऊन आला आहात का? ज्यांनी पिढ्यानपिढ्या राज्य केलं त्यांनीही उत्तर द्यावं असंही शहांनी म्हटलं.

हे वाचा - मोदी असोत किंवा मनमोहन सिंग, पंतप्रधानांचा नेहमीच अपमान करतात राहुल गांधी- सीतारामन

काय म्हणाले अमित शहा

  • मोदी सरकार आल्यानंतर काश्मीरमध्ये पंचायत राज सुरु झाले. 
  • काश्मीरमध्ये तीन लोकांच्या कुटुंबातील लोकच राज्य करत होते.
  • जम्मू काश्मीरमध्ये परंपरा बदलत आहेत, विकास होतोय. 
  • काश्मीरमध्ये आतापर्यंत 28 योजना पूर्ण झाल्या असून विकासाला सरकारने प्राधान्य दिलं आहे.
  • इथल्या मुलांच्या हातात बंदूकांच्या जागी क्रिकेट बॅट असावी यासाठी आम्ही प्रयत्न केले.
  • एमआयएमचे असददुद्दिन औवेसी हे अधिकाऱ्यांचेसुद्धा हिंदू मुस्लिम अशी विभागणी करतात.

हेही वाचा- 'हम दो, हमारे दो' वेळी जावयाच्या जमिनीचा उल्लेख केला असता तर...अर्थमंत्र्यांच्या निशाण्यावर राहुल गांधी

काश्मीरमधून कलम 370 हटवून काय झालं असा प्रश्न मोदी सरकारला विचारला. काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी म्हणाले की, काश्मीरी पंडितांना वचने दिली पण ती पूर्ण केली नाहीत. गिलगिट बाल्टिस्तान आणण्याची वक्तव्ये केलीत. ते दूरच किमान जे लोक काश्मीरमध्ये परत येऊ इच्छित आहेत ते तरी करा असंही काँग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी यांनी म्हटलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lok sabha budget session 2021 union minister amit shah kashmir congress bjp