मोदी असोत किंवा मनमोहन सिंग, पंतप्रधानांचा नेहमीच अपमान करतात राहुल गांधी- सीतारामन

Rahul gandhi.jpg
Rahul gandhi.jpg

नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार शब्दांत हल्लाबोल केला. आपल्या धारदार भाषणात त्यांनी राहुल गांधी यांच्या राजकीय चरित्रावर तिखट शब्दांत टीका केली. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसच्या आर्थिक नीतींवरही भाष्य केले.  पंतप्रधानांचा अपमान करण्याची त्यांना सवयच लागली आहे. भले मग ते मनमोहन सिंग असोत, असे राहुल गांधी यांच्या वर्तणुकीवर बोलताना त्या म्हणाल्या.

नेहमीच पंतप्रधानांचा अपमान
त्या पुढे म्हणाल्या की, राहुल गांधी नेहमीच पंतप्रधानांचा अपमान करतात. मग ते आताचे पंतप्रधान असोत की पूर्वीचे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग जेव्हा विदेशात गेले होते. तेव्हा राहुल गांधी यांनी त्यांच्याकडून आणला गेलेला अध्यादेश फाडून फेकून दिला होता. 

ही घटना 2013 या वर्षातील आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी दोषी लोकप्रतिनिधींना निवडणूक लढण्याविरोधात निर्णय दिला होता. हा निर्णय निष्प्रभ ठरवण्यासाठी यूपीए सरकारने अध्यादेश जारी केला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी हा मूर्खपणा असल्याचे सांग तो अध्यादेश फाडून फेकून दिला होता. राहुल गांधी यांनी जेव्हा 2013 मध्ये अध्यादेश फाडला होता. त्याचवेळी मनमोहन सिंग यांनी राजीनामा द्यायला हवा होता, असे नियोजन आयोगाचे तत्कालीन प्रमुख माँटेकसिंग अहलूवालिया यांनी म्हटले होते. 

यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या 'हम दो, हमारे दो' या वक्तव्याचा समाचार घेतला.  'हम दो, हमारे दो' वेळी जावयाला जमीन परत करण्यास सांगितलं असतं तर चांगलं झालं असतं. परंतु, असं काही तुम्ही बोलला नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. राहुल गांधींनी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग का घेतला नाही? शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार म्हणून मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेसने नंतर नकार का दिला. कृषी कायद्यावर यू टर्न का घेतला, याविषयांवर ते बोलतील असे वाटले होते, असे त्या म्हणाल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com