Loksabha 2019 : 'लोकसभा निवडणूकांच्या तारखा बदला'

Lok Sabha election 2019  Muslims leaders take objection on elections date
Lok Sabha election 2019 Muslims leaders take objection on elections date

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी (ता. 10) जाहीर केल्या असून, निवडणुकीच्या तारखांवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुस्लिम धर्मगुरुंनी लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर आक्षेप घेतला आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या तारखा या रमजान महिन्यात येतात. यामुळे निवडणूकांच्या तारखा बदलण्याची मागणी मुस्लिम धर्मगुरुंनी केली आहे.

मुस्लिम बांधवांचा 6 मे पासून रमजानचा महिना सुरु होणार आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान महिन्यात निवडणुका घेऊ नये, रमजाननंतर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी देवबंदी उलेमा या मुस्लिम संघटनेने केली आहे. मदरसा जामिया शैखुल हिंदचे आलीम मुफ्ती असद कसमी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या लोकसभा निवडणुकींच्या तारखांवर आक्षेप घेतला आहे. रमजानसारख्या पवित्र महिन्याची मुस्लिम समाज वर्षभर आतुरतेने वाट पाहतो. मुस्लिम समाजासाठी हा महिना पवित्र मानला जातो. यावेळी मुस्लिम रमजानचा रोजा ठेवतो, नमाज पठण करतो या काळात निवडणुकीत मतदान करणे शक्य होणार नाही, असे मत मुफ्ती असद कसमी यांनी व्यक्त केले आहे.

मुस्लिम धर्मगुरु खालिद रशीद फरंगी यांनीही लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर आक्षेत घेतला आहे. खालिद रशीद फरंगी यांनी लोकसभा निवडणुकीचे मतदान रमजाननंतर घेण्यात यावे, अशी मागणीही केली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम यांनीही लोकसभा निवडणुकीच्या तारखांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने पुर्नविचार करावा अशी मागणी केली.

कोलकाताचे महापौर आणि तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हाकिम म्हणाले, निवडणूक आयोग एक संवैधानिक संस्था असून आम्ही त्यांचा सन्मान करतो. आम्ही निवडणूक आयोगाविरोधात काही बोलू इच्छित नाही. पण 7 टप्प्यात होणाऱ्या निवडणुका बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या नागरिकांसाठी कठीण असेल. इतकेच नव्हे तर या निवडणुकीत सर्वाधिक त्रास मुस्लिमांना होईल. कारण या मतदानाच्या तारखा रमजान महिन्यात ठेवण्यात आल्या आहेत.

पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यात अल्पसंख्यकांची लोकसंख्या जास्त आहे. मुस्लिम रोजे ठेवणार आणि आपले मत ही देणार याची निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे, अशी मागणी मुस्लिम धर्मगुरुंनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com