Goa Lok sabha election 2024 : गोव्यात काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा; विद्यमान खासदाराचं तिकीट कापून विधानसभेत पराभूत नेत्याला संधी

ख्रिश्चनबहुल मतदारसंघात काँग्रेसने कॅप्टन व्हिरीआटो फर्नांडीस यांना उमेदवारी दिली आहे. ते गेल्या विधानसभा निवडणुकीत दाबोळिन मतदारसंघातून पराभूत झाले होते. त्यांच्यावर आता लोकसभा निवडणूक लढविण्याची जबाबदारी सोपविली आहे.
Goa Lok sabha election 2024
Goa Lok sabha election 2024sakal

Lok sabha elections 2024 : काँग्रेसने गोवा मध्यप्रदेश या राज्यांसह दादरा व नगरहवेली या मतदारसंघातील एकूण सहा उमेदवारांची नावे जाहीर केली. विशेष म्हणजे दक्षिण गोवा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान खासदार फ्रांसिस्को सारदिन्हा यांची उमेदवारी कापून गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या कॅप्टन व्हिरीआटो फर्नांडिस यांना उमेदवारी दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांना उत्तर गोवा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

उत्तर गोवा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या विरोधात ७६ वर्षीय माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांना उतरविण्यात आले आहे. दक्षिण गोव्यातील खासदार फ्रांसिस्को सारदिन्हा यांची उमेदवारी कापण्यात आली आहे. ते काही वर्षांपूर्वी टीएमसीमध्ये सुद्धा गेले होते. पुन्हा काँग्रेसमध्ये परतले.

Goa Lok sabha election 2024
Pakistan Cricket: टी20 वर्ल्डकपची तयारी की आर्मी भरती? पाकिस्तानी संघाच्या फिटनेस कॅम्पचा Video व्हायरल

या ख्रिश्चनबहुल मतदारसंघात काँग्रेसने कॅप्टन व्हिरीआटो फर्नांडीस यांना उमेदवारी दिली आहे. ते गेल्या विधानसभा निवडणुकीत दाबोळिन मतदारसंघातून पराभूत झाले होते. त्यांच्यावर आता लोकसभा निवडणूक लढविण्याची जबाबदारी सोपविली आहे.

Goa Lok sabha election 2024
Eknath Khadse : एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार? भाजप प्रवेश निश्चित झाल्याच्या चर्चा

मुरैनातून सत्यपाल सिंग

मध्यप्रदेशातील मुरैना मतदारसंघातून सत्यपाल सिंग सिकरवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे बंधू सध्या आमदार असून त्यांच्या पत्नी ग्वाल्हेरच्या महापौर आहेत. ग्वाल्हेरमधून गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या प्रवीण पाठक यांनाच पुन्हा ग्वाल्हेर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. खांडवा मतदारसंघातून नरेंद्र पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दादरा व नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशातून अजित रामजीभाई माहला यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com