Lok Sabha Election 2024 : खासदारकीच्या रेसमध्ये असलेल्या राजघराण्यातील उमेदवारांचं काय झालं?

lok sabha election 2024 result : महाराष्ट्रात भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून उमेदवारी दिली होती.
lok sabha election 2024 result Marathi News
lok sabha election 2024 result Marathi Newssakal

नवी दिल्ली, ता. ४ (पीटीआय) : यंदाच्या निवडणुकीत भाजपसह विविध राजकीय पक्षांनी राजघराण्यातील लोकांना उमेदवारी दिली होती. यापैकी भाजपच्या तिकिटावर लढलेल्या अनेक उमेदवारांनी चांगले यश मिळविल्याचे निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रात भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे यांचा पोटनिवडणुकीत पराभव झाला होता. यंदा मात्र ते विजयी झाले. त्यांच्याबरोबरच कोल्हापुरातही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनादेखील जनतेने निवडून दिले. मध्य प्रदेशात वडील माधवराव शिंदे यांच्यापासून असलेले काँग्रेसबरोबरील संबंध तोडून २०२० मध्ये भाजपमध्ये दाखल झालेले ग्वाल्हेर घराण्याचे वंशज ज्योतिरादित्य शिंदे हे त्यांच्या पारंपरिक गुना मतदारसंघातून निवडून आले आहेत. मागील निवडणूक काँग्रेसकडून लढताना ते याच मतदारसंघातून पराभूत झाले होते.

lok sabha election 2024 result Marathi News
Lok Sabha election: लोकसभेच्या निकालाबाबत जगाला काय वाटतं? पाकिस्तान, तुर्की, ब्रिटनसारख्या देशांची प्रतिक्रिया काय?

राजस्थानमध्ये धोलपूर संस्थानचे युवराज दुष्यंत सिंह यांचा झालावार-बारन मतदारसंघातून विजय झाला. ते पाचव्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. महाराणा प्रताप यांचे वंशज असलेले विश्‍वराजसिंह मेवाड यांच्या पत्नी महिमाकुमारी मेवाड यांनाही भाजपने उमेदवारी दिली होती. त्यादेखील राजसमंद मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. दक्षिणेत भाजपने म्हैसूर राजघराण्याचे वारसदार यदुवीर कृष्णदत्त चामराज वडियार यांना उमेदवारी दिली होती. अमेरिकेत शिक्षण झालेल्या यदुवीर यांचा या राजघराण्याचे २७ वे राजे म्हणून नऊ वर्षांपूर्वी झालेल्या राज्याभिषेक समारोह गाजला होता. यावर्षी ‘लोकाश्रया’ला आलेल्या या नामधारी राजाला जनतेने विजयी केले.

lok sabha election 2024 result Marathi News
Dhule Lok Sabha Constituency : 15 वर्षांनंतर काँग्रेस बालेकिल्ल्यात परत! डॉ. बच्छाव यांच्या विजयाने पक्षाला नवी पालवी

राजघराण्यातील प्रमुख विजयी (भाजप)

- मालविका देवी (कालाहंडी घराणे) : कालाहंडी मतदारसंघ, ओडिशा
- कृतीसिंह देववर्मा (त्रिपुरा घराणे) : त्रिपुरा पूर्व मतदारसंघ, त्रिपुरा


राजघराण्यातील प्रमुख पराभूत

- विक्रमादित्य सिंह, काँग्रेस : मंडी मतदारसंघ, हिमाचल प्रदेश
- राजमाता अमृता रॉय, भाजप : कृष्णनगर मतदारसंघ, प. बंगाल
- प्रणीत कौर (पतियाळा घराणे), भाजप : पतियाळा, पंजाब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com