Dhule Lok Sabha Constituency : 15 वर्षांनंतर काँग्रेस बालेकिल्ल्यात परत! डॉ. बच्छाव यांच्या विजयाने पक्षाला नवी पालवी

Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणूक २०२४ च्या प्रचारादरम्यान आगळीवेगळी ठरली, तर निकालाच्या दृष्टीने उत्कंठावर्धक राहिली.
Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency esakal

Dhule Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणूक २०२४ च्या प्रचारादरम्यान आगळीवेगळी ठरली, तर निकालाच्या दृष्टीने उत्कंठावर्धक राहिली. धुळे लोकसभा मतदारसंघासाठीही ही निवडणूक विशेषतः भाजप महायुती व काँग्रेस महाविकास आघाडीसाठी कलाटणी देणारी ठरल्याचे दिसते. धुळे मतदारसंघ हा तसा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला. गेल्या ७२ वर्षांतील तब्बल ४७ वर्षे काँग्रेसचा हा बालेकिल्ला राहिला, तर २५ वर्षे भाजपनेही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला अधूनमधून सुरुंग लावला. ( After 15 years Congress Bachao victory gave party new best )

आता गेल्या १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा काँग्रेसला आपला हा बालेकिल्ला परत मिळाला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघ १९५२ ते १९८० दरम्यान सर्वसाधारण संवर्गासाठी होता. तो १९८० नंतर अनुसूचित जमातीसाठी राखीव राहिला. मात्र, २००९ पासून हा मतदारसंघ पुन्हा सर्वसाधारण संवर्गासाठी खुला झाला. गेल्या ७२ वर्षांतील दीर्घकाळ अर्थात तब्बल ४७ वर्षे धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अधिराज्य राहिले. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला कुणी सुरुंग लावणार नाही असाच समज होता.

मात्र लोकशाहीच्या या प्रक्रियेत ना कोणता उमेदवार, ना कोणता राजकीय पक्षाची मक्तेदारी कायम टिकून राहात नाही हेच खरे. धुळे लोकसभा मतदारसंघही त्याला अपवाद नाही. त्यामुळे काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यालाही अधूनमधून सुरुंग लागत राहिला. असे असले तरी काँग्रेसचे मूळ मात्र अद्यापही जिवंत आहे. यंदाच्या निवडणुकीत मित्रपक्षांच्या साथीने पक्षाच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्या रूपाने त्याला नव्याने पालवी फुटली आहे.

दोन हॅट्‍ट्रिक मॅन

धुळे लोकसभा मतदारसंघातर्फे काँग्रेसच्या तत्कालीन दोन लोकप्रतिनिधींनी हॅट्‍ट्रिकची किमया साधली. यात चूडामण आनंदा पाटील यांनी १९६२, १९६७ व १९७१ अशा सलग तीन निवडणुका जिंकून तर रेशमा मोतीराम भोये यांनी १९८०, १९८४ व १९८९ अशा सलग तीन निवडणुका जिंकून हॅट्ट्रिकची किमया साधल्याचा इतिहास आहे. त्यांच्यानंतर बापू हरी चौरे यांनीही काँग्रेसकडून दोनदा विजय संपादित केला. मात्र, त्यांना सलग किंवा विजयाची हॅट्ट्रिक साधता आली नाही. (latest marathi news)

Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency : पहिल्या महिला उमेदवार बच्छावांच्या लढतीकडे लक्ष; काँग्रेसचे डॉक्टर कुटुंब प्रचारात

भामरेंची हॅट्ट्रिक हुकली

१९५२ पासून झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये १९५७ च्या निवडणुकीत जनसंघाचे उत्तमराव पाटील, १९९६ मध्ये भारतीय जनता पक्षाचे साहेबराव सुकराम बागुल, १९९९ मध्ये भारतीय जनता पक्षाचे रामदास रूपला गावित यांनी निवडणूक जिंकली. त्यानंतर काँग्रेसने पुन्हा मतदारसंघ मिळविला.

मात्र २००९, २०१४ व २०१९ अशा सलग तीन निवडणुका जिंकून भाजपने हॅट्ट्रिक साधली. यात २०१४ व २०१९ अशा सलग दोन निवडणुकीत डॉ. भामरे यांनी भाजपकडून विजय मिळविला. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत त्यांची विजयाची हॅट्ट्रिक हुकली. परिणामी, डॉ. शोभा बच्छाव यांच्या विजयामुळे १५ वर्षांनंतर काँग्रेसला आपला बालेकिल्ला परत मिळाला आहे.

निवडणूक वर्ष...विजयी लोकप्रतिनिधी...मिळालेली मते...पक्ष

-१९५२...शालिग्राम रामरतन भारतीया...१,७१,२४२...काँग्रेस

-१९५७...उत्तमराव लक्ष्मणराव पाटील...१,२२,२३२...जनसंघ

-१९६२...चूडामण आनंदा पाटील...१,४८,४५२...काँग्रेस

-१९६७...चूडामण आनंदा पाटील...१,६४,३४९...काँग्रेस

-१९७१...चूडामण आनंदा पाटील...२,०४,४६१ काँग्रेस

Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency : निकालाबाबत उत्सुकता शिगेला; आकडेमोड सुरुच

-१९७७...विजयकुमार नवल पाटील...१,७८,७३५...भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

-१९८०...रेशमा मोतीराम भोये...१,९६,००६...भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय)

-१९८४...रेशमा मोतीराम भोये...२,१९,३२३...भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय)

-१९८९...रेशमा मोतीराम भोये...२,१३,०५९...भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय)

-१९९१...बापू हरी चौरे...२,११,८९५...भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

-१९९६...साहेबराव सुकराम बागूल...१,८४,५६३...भारतीय जनता पक्ष

-१९९८...डी. एस. अहिरे...२,७४,०३४...भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

-१९९९...रामदास रूपला गावित...२,११,९०४...भारतीय जनता पक्ष

-२००४...बापू हरी चौरे...२,१०,४१४...भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

-२००९...प्रताप नारायणराव सोनवणे...२,६३,२६०...भारतीय जनता पक्ष

-२०१४...डॉ. सुभाष रामराव भामरे...५,२९,४५०...भारतीय जनता पक्ष

-२०१९...डॉ. सुभाष रामराव भामरे...६,२३,५३३...भारतीय जनता पक्ष

-२०२४...डॉ. शोभा दिनेश बच्छाव...५,८३,८६६...भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency : भाजपनेच भाजपला पाडले! शेतकऱ्यांसह मुस्लिम, इतर घटकांची नाराजी काँग्रेसच्या पथ्यावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com