Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

rahul gandhi priyanka gandhi
rahul gandhi priyanka gandhiesakal

नवी दिल्लीः महाराष्ट्रात जे शिवसेनेचं झालं अन् जे राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं तेच आता काँग्रेसमध्ये होणार असल्याचा दावा केला जातोय. काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर मोठी फूट पडणार असल्याचं चित्र आहे. ४ जूननंतर काँग्रेसमध्ये भूकंप येईल, असा दावा आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधींच्या रायबरेली येथील उमेदवारीवरुन हल्ला चढवला. ते म्हणाले की, राहुल गांधी अन् प्रियांका गांधी यांच्याविरोधात षड्यंत्र केलं जातंय. त्यामुळे चार जूननंतर काँग्रेसमध्ये एक मोठी फूट पडण्याची शक्यता आहे.

rahul gandhi priyanka gandhi
Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

एक काँग्रेस राहुल गांधींची असेल अन् एक काँग्रेस प्रियांका गांधींची असेल, असा दावा प्रमोद कृष्णम यांनी केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ज्वालामुखी धगधगतोय. सगळ्या षड्यंत्रासंबंधी प्रियांका गांधींना माहिती आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधींच्या अमेठीऐवजी रायबरेली येथून लढण्याच्या निर्णयाला चुकीचा निर्णय म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की, जेव्हा राजाच मैदान सोडून पळून जातो तेव्हा सैन्य पराभव मान्य करत असतं. आता बघा काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून जातील.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अपमानावर बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधींनी हेही माहिती नसेल की द्वारका कुठे आहे? द्वारकाधीश कोण आहेत? त्यांना केवळ दिल्लीतली द्वारिका माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com