VIDEO - 'ऐकून घेण्याची ताकद ठेवा', उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावून आल्या सुप्रिया सुळे

supriya sule
supriya sule

नवी दिल्ली - संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सोमवारी महाराष्ट्रातील प्रकरणाचे पडसाद उमटले. यावरून दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळही झाला. विमा संशोधन विधेयकावर चर्चेवेळी बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील मुद्द्यावरही त्यांचे म्हणणे मांडले. यावेळी लोकशाहीतील काळा दिवस असल्याचं सांगत सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केला. तसंच ठाकरे सरकारची पाठराखणही यावेळी सुप्रिया सुळेंनी केली. लोकसभेत सत्ताधारी सदस्यांना विरोधकांपेक्षा जास्त संधी मिळाली आणि तेसुद्धा तब्बल आठजण एकाच विषयावर बोलले याबाबत वाईट वाटतं असं सुप्रिया सुळे म्हणाले. शून्य प्रहरात आठजण बोलले. विशेष म्हणजे त्यांची नावेही नियोजित यादीत नव्हती. लोकशाहीतील हा काळा दिवस आहे. लोकसभा अध्यक्षांना अधिकार असतात याची कल्पना आहे पण आम्ही नियम पाळत असू तर त्यानुसार बोलण्याची संधी द्यायला हवी असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलायला सुरुवात करतानाच नाराजी व्यक्त केली. शून्य प्रहरात महाराष्ट्रातील मुद्द्यावर आठ लोक बोलले पण आम्हाला आमचे म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही याबद्दल वाईट वाटतं. राष्ट्रवादीबद्दल तर पंतप्रधानांनीसुद्धा म्हटलं की आम्ही कधी वेलमध्ये येत नाही. जर आम्ही सर्व नियमांचे पालन करतो तर मग बोलण्याची संधीसुद्धा दिली पाहिजे. आमचा आवाज दाबू नये. 

उद्धव ठाकरे यांची पाठराखण करताना सुप्रिया सुळे यांनी शिवसेना भाजप संबंधाचा उल्लेख केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजप आणि शिवसेनेची 25 वर्षे युती होती. मात्र आज सभागृहात शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्यात आल्यानं मला धक्का बसला. 

विमा संशोधन विधेयकावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार हे यु टर्न सरकार असल्याचं म्हटलं. सरकारचा हा आणखी एक युटर्न आहे. जेव्हा भाजप विरोधी बाकावर होता तेव्हा त्यांचे दोन दिवंगत नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांनी विरोध केला होता. आता सरकारने यावरच युटर्न घेतला असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत असे कार्यक्रम आपण आणताय ज्यांची सुरुवात ७० वर्षांपुर्वी झाली. दुसरं असं की तुम्ही आता स्वतःच 'इस्ट इंडिया कंपनी' झालाय काय? इतिहास याची नोंद घेईल.

महाराष्ट्रात दोन तासांसाठी वीज गेली. चीनी हॅकर्सचा हा हल्ला होता असं सरकारी अहवाल सांगत आहेत.

जर हे होत असेल तर जगभरातून जिथं गुंतवणूक होतेय पण सर्वसामान्यांच्या पैशाचं, पैशांचं तुम्ही कसं संरक्षण करणार आहात ? तुम्ही जवळपास सर्वच क्षेत्रात खासगीकरण करीत आहात ? तुम्ही खासगीकरण करीत असताना तुम्हाला त्यातून नेमकं काय मिळतंय.

कोरोनाच्या संकटकाळात अर्थव्यवस्था संकटात असताना खासगीकरणातून तुम्ही कशा प्रकारे अर्थव्यवस्थेला बळ देणार आहे हे सरकारने सांगायला पाहिजे. आता आपण या काळात विम्याचे क्षेत्र खुले करीत असाल तर जो गरीब विमा खरेदी करतोय त्याच्या हिताचे कशाप्रकारे संरक्षण करणार याबद्दल सांगायला पाहिजे.

सध्या नोकऱ्या जात आहेत. शिक्षणक्षेत्रात अनुत्पादित कर्जांचे प्रमाण वाढतेय. मुलं फी भरु शकत नाहीत अशी स्थिती आहे. यातून तुम्ही कशा प्रकारे मार्ग काढणार आहात?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com