

Parliament protest rules Lok Sabha Secretariat
esakal
Ram Mandir donation controversy discussion: अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरीच्या मुद्द्यावरून संसद भवनाच्या मकर दाराजवळ एक अनोखं आंदोलन करण्यात आलं. पुजाऱ्याचा वेष परिधान करून नाट्यमय आंदोलन करणाऱ्या खासदारांवर लोकसभा अध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खासदार पप्पू यादव आणि विरोधी पक्षांच्या या ‘नाट्यमय’ आंदोलनानंतर, संसद परिसरात अशा प्रकारच्या वेशभूषांवर आधारित किंवा प्रतिकात्मक आंदोलनांना परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत सचिवालयाने दिले आहेत.