Loksabha 2019 : कर्नाटकात काँग्रेस-धजद युतीचा निर्णय

Loksabha 2019 : कर्नाटकात काँग्रेस-धजद युतीचा निर्णय

बंगळूर - लोकसभेसाठी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीच्या हालचाली वाढविल्या आहेत. काँग्रेस व धजदने युती करण्याचा निर्णय घेतला असला तरी मतदारसंघ वाटपात दोन्ही पक्षांत अद्याप एकमत झालेले नाही. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या विरोधात प्रभावी उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असून खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. 

धजदने १२ लोकसभा मतदारसंघांचा काँग्रेसकडे आग्रह धरला होता. परंतु काँग्रेसकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळल्याने किमान ९ मतदारसंघ देण्याची विनंती केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धजदला मंड्या, हासन, बंगळूर उत्तर, शिमोगा, कारवार, विजापूर मतदारसंघ सोडण्याची काँग्रेसची तयारी आहे. प्रामुख्याने धजदने म्हैसूर मतदारसंघाची मागणी केली आहे.

काँग्रेसचे विद्यमान खासदार असलेले चिक्कबळ्ळापूर, तुमकूर मतदारसंघ देण्याची धजदची मागणी आहे. परंतु काँग्रेसचा त्याला विरोध आहे. कॉंग्रेसचे विद्यमान खासदार असलेले मतदारसंघ सोडायचे झाल्यास धजदचा खासदार असलेला मंड्या मतदारसंघ सोडा, अशी कॉंग्रेसने मागणी केली आहे. मंड्या मतदारसंघातून मुख्यमंत्री कुमारस्वामी याचे पुत्र निखील निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. हा मतदारसंघ सोडण्याची धजदची तयारी नाही. त्यामुळे विद्यमान सदस्य 
असलेले मतदारसंघ ज्या त्या पक्षांकडे ठेवण्यास दोघेही राजी झाले आहेत. 

म्हैसूर मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात येत आहे. इतर मतदारसंघासाठी संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीला पाठविण्यात आली आहे. त्याला आता लवकरच हायकमांडची मान्यता घेऊन अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे. 

इतर संभाव्य उमेदवार 
बेळगाव - अंजली निंबाळकर 
बागलकोट - नागराज यादव 
विजापूर - विवेकराव पाटील 
बिदर - ईश्वर खंड्रे/विजयसिंग/ सी. एम. इब्राहीम 
कोप्पळ - बसवमगौड बादर्ली/ विरुपाक्षप्पा/ बसवराज हिटनाळ/ बसवराज रायरेड्डी 
हावेरी - बी. आर. पाटील/ बसवराज शिवनण्णवर/ सलीम अहमद 
धारवाड - शाकीर सनदी/ एम. एम. हिंडसगेरी/ विनय कुलकर्णी / डॉ. नल्वाड 
कारवार - निवेदिता अळ्वा, भिमण्णा नायकर/ प्रशांत देशपांडे 
दावनगेरे - शामनूर शिवशंकरप्पा/ मंजप्पा/ एच. एम. रेवण्णा 
उडपी - चिक्कमंगळूर  बी. एल. शंकर/प्रमोद मध्वराज/ आरती कृष्ण 
दक्षिण कन्नड - बी. के. हरिप्रसाद/ रानाथ रै/ ऐव्हान डिसोजा/मोहिद्दिन बाव 
म्हैसूर - विजयशंकर/ सुरज हेगडे 
बंगळूर उत्तर - एम. आर. सिताराम/ सी. नारायणस्वामी/ बी. एल. शंकर 
बंगळूर मध्य- रिज्वान अर्षद/ रोशन बेग/ एच. टी. सांग्लीयान 
बंगळूर दक्षिण- रामलिंगा रेड्डी/ प्रिया कृष्ण
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com