Loksabha 2019 : मोदींना गुजरातला पाठविण्याची हीच वेळ : हार्दिक पटेल

वृत्तसंस्था
सोमवार, 8 एप्रिल 2019

सध्याच्या सरकारकडे त्यांनी केलेल्या कामाची माहिती देण्यासारखे काही नसल्याने काश्मीर आणि पाकिस्तानसारखे मुद्दे ते उपस्थित करत आहेत. युवावर्ग भाजपबद्दल प्रचंड नाराज आहे. मोदींना पुन्हा गुजरातला पाठविण्याची हीच वेळ आहे. मी चौकीदार आहे, मला मत द्या असे आतापर्यंत कोणाला बोलताना ऐकले आहे का. 

मुंबई : भाजपच्या मै भी चौकीदार मोहिमेची खिल्ली उडवत काँग्रेस नेता हार्दिक पटेलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा गुजरातला पाठविण्याची हीच वेळ असल्याचे म्हटले आहे.

गुजरातमध्ये पाटीदार नेता म्हणून ओळख असलेल्या हार्दिक पटेलने नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याला लोकसभा निवडणूक लढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली असून, भाजपला त्याच्याकडून लक्ष्य करण्यात येत आहे. रविवारी मुंबईत एका प्रचारसभेत बोलताना हार्दिकने भाजपच्या मोहिमेची खिल्ली उडविली.

हार्दिक म्हणाला, की सध्याच्या सरकारकडे त्यांनी केलेल्या कामाची माहिती देण्यासारखे काही नसल्याने काश्मीर आणि पाकिस्तानसारखे मुद्दे ते उपस्थित करत आहेत. युवावर्ग भाजपबद्दल प्रचंड नाराज आहे. मोदींना पुन्हा गुजरातला पाठविण्याची हीच वेळ आहे. मी चौकीदार आहे, मला मत द्या असे आतापर्यंत कोणाला बोलताना ऐकले आहे का. 

Web Title: Loksabha election 2019 Congress leader Hardik Patel says it is time to sent PM Narendra Modi