Loksabha Election 2019 : 'तुम्ही' मुस्लिम समाजाचा ठेका घेऊ नका: ओवेसी

Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi

हैदराबादः रमजानच्या महिन्यात कामावर जाऊ शकता, तर मतदान करायला का जाऊ शकत नाहीत? रमजान महिन्यातील मतदानाच्या तारखा असण्याबद्दल आपला काहीच अक्षेप नाही. निवडणुकांच्या तारखांवरुन राजकारण करण्यांना एवढचं सांगेल की तुम्ही मुस्लिम समाजाचा ठेका घेऊ नका, असे एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी (ता. 10) जाहीर केल्या असून, निवडणुकीच्या तारखांवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुस्लिम धर्मगुरुंनी लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर आक्षेप घेतला आहे. पश्‍चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या तारखा या रमजान महिन्यात येतात. यामुळे निवडणूकांच्या तारखा बदलण्याची मागणी मुस्लिम धर्मगुरुंनी केली होती.

निवडणुकांच्या तारखांवरुन उगाच वाद निर्माण केला जात आहे. रमजानमधील निवडणुकांना आपला काहीही आक्षेप नाही. ओवेसी यांनी व्हिडिओ तयार करून तो ट्विट केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, 'निवडणुकांच्या तारखांवरुन राजकारण करण्यांना एवढचं सांगेल की तुम्ही मुस्लिम समाजाचा ठेका घेऊ नका. निवडणुका येतील आणि जातील. मुस्लिम लोक रोजा पाळणार, नमाज पठण करणार आणि रमजानचा पवित्र महिना मोठ्या उत्सहात साजरा करणार. रमझानचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होईल, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. उलट मला विश्वास आहे की रमझानमध्ये मुस्लिमांचा उत्साह अधिक असतो त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल. रमजान आणि निवडणुकांच्या तारखांवरुन तक्रार करणारे लोक रोजा असतो तेव्हा कमावर जात नाहीत का? रमजानचे कारण देत निवडणुकांच्या तारखांवरुन वाद निर्माण करणाऱ्यांना मुस्लिमांची इतकीच काळजी असेल तर ते उरलेल्या अकरा महिन्यांमध्ये मुस्लिम समजासाठी काय करतात ते सांगावे.'

दरम्यान, पश्‍चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यात अल्पसंख्यकांची लोकसंख्या जास्त आहे. मुस्लिम रोजे ठेवणार आणि आपले मत ही देणार याची निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे, अशी मागणी मुस्लिम धर्मगुरुंनी केली आहे.

मुस्लिम बांधवांचा 6 मे पासून रमजानचा महिना सुरु होणार आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान महिन्यात निवडणुका घेऊ नये, रमजाननंतर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी देवबंदी उलेमा या मुस्लिम संघटनेने केली आहे. मदरसा जामिया शैखुल हिंदचे आलीम मुफ्ती असद कसमी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या लोकसभा निवडणुकींच्या तारखांवर आक्षेप घेतला आहे. रमजानसारख्या पवित्र महिन्याची मुस्लिम समाज वर्षभर आतुरतेने वाट पाहतो. मुस्लिम समाजासाठी हा महिना पवित्र मानला जातो. यावेळी मुस्लिम रमजानचा रोजा ठेवतो, नमाज पठण करतो या काळात निवडणुकीत मतदान करणे शक्‍य होणार नाही, असे मत मुफ्ती असद कसमी यांनी व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com