Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Chief Minister Nitish Kumar politics
Chief Minister Nitish Kumar politicsesakal

Bihar CM Nitish Kumar News : बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांचे एकमेकांवर कठोर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एका विधानामुळे बिहारचं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यांच्या त्या राजकीय विधानाचा परिणाम पुढच्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीवर होणार असल्याचंही राजकीय जाणकार सांगतात.

मुंगेरच्या सूर्यगडा येथील जेडीयू उमेदवार ललन सिंह यांच्या समर्थनार्थ आयोजि प्रचारसभेमध्ये नितीश कुमार बोलत होते. यावेळी त्यांनी आपण आरजेडीसोबत काही काळ गेलो असलो तरी पुन्हा भाजपसोबत आल्याचं सांगून माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांचे कारनामे मला कळले होते, असं त्यांनी म्हटलं.

नितीश कुमार म्हणाले की, आरडेजीसोबत असताना मला त्यांची गडबड लक्षात आली होती. तेव्हाच मी निश्चय केला की आता या लोकांसोबत राहणार नाही. आमच्या सगळ्या विरोधकांना खरेदी करण्याचा प्रयत्न काहीजण करत होते. त्यांना मोठी रक्कम देण्याचं आमिष देण्यात येत होतं. परंतु ते यशस्वी झाले नाहीत, असाही दावा नितीश कुमारांनी केला.

Chief Minister Nitish Kumar politics
Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

यापुढे नितीश कुमार जे बोलले त्यामुळे बिहारचं राजकीय वातावरण गरम झालं आहे. ते म्हणाले की, आमच्यासोबत राहून जेवढं इकडे तिकडे केलं, या सगळ्याची चौकशी होणार. निवडणुकीनंतर आम्ही एकेका प्रकरणाची चौकशी करु. इथे आम्ही लोकांसाठी काम करतो. मात्र कुणी कुणी आपल्या कुटुंबासाठी काम करतात. त्यामुळे जिथे जिथे गडबड झाली तिथे चौकशी होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com