Loksabha Election : मोदी पुन्हा वाराणसीतून मैदानात; शहा गांधीनगर, तर राजनाथ लखनौतून

भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेत आज १९५ उमेदवारांची पहिली जम्बो यादी जाहीर केली.
Narendra modi and Amit Shah
Narendra modi and Amit ShahEsakal

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेत आज १९५ उमेदवारांची पहिली जम्बो यादी जाहीर केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा पारंपरिक बालेकिल्ला असणाऱ्या वाराणसीतून तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोटा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान ३४ मंत्र्यांना लोकसभेच्या रणांगणात उतरविण्यात आले आहे.

या उमेदवार यादीतून भाजपने आज अनेक ठिकाणची भाकरी फिरविली. दिल्लीतील सातपैकी चार खासदारांच्या उमेदवारी कापण्यात आली आहे. भोपाळच्या वादग्रस्त खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. केंद्रीय परराष्ट्रव्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, वाद्ग्रस्त खासदार रमेश बिधुडी यांना तिकीट देण्यात आलेले नाही.

गेल्या २९ फेब्रुवारीला भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या बैठकीत १६ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशातील १९५ उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. नव्या उमेदवारांमध्ये तरुणाईचा समावेश केला असून आज जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेले ४७ उमेदवार आहेत. आज जाहीर झालेल्या जागांमध्ये सर्वाधिक ५१ जागा एकट्या उत्तरप्रदेशातील आहेत.

त्यापाठोपाठ मध्यप्रदेशातून २४ जागांची घोषणा करण्यात आली. आज जाहीर झालेल्या यादीत अपेक्षेप्रमाणे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, माजी मुख्यमंत्री विप्लव देव, खासदार सरोज पांडे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

राज्यनिहाय जाहीर झालेले उमेदवार (कंसात एकूण जागा)

उत्तरप्रदेश : ५१ (८०), पश्चिम बंगाल : २० (४२), मध्यप्रदेश : २४ (२९), गुजरात : १५ (२६), राजस्थान : १५ (२५), केरळ : १२ (२०), तेलंगण : ९ (१७), आसाम : ११ (१४), झारखंड : ११ (१४), छत्तीसगड : ११ (११), दिल्ली : ५ (७), जम्मू व काश्मीर : २ (६), अरुणाचल प्रदेश : २ (२), गोवा : १ (२), त्रिपुरा : १ (२), व केंद्रशासित प्रदेशातील अंदमान व निकोबार : १ (१) व दमन व दिऊ : १ (१)

उमेदवारी मिळालेले मंत्री

राजनाथसिंह - लखनौ (उत्तरप्रदेश), अमित शहा - गांधीनगर (गुजरात),किरण रिजिजू - अरुणाचल पश्चिम (अरुणाचल प्रदेश), सर्वानंद सोनोवाल - दिब्रुगड (आसाम), श्रीपाद नाईक - उत्तर गोवा (गोवा), पुरुषोत्तम रुपाला - राजकोट, मनसुखभाई मंडाविया - पोरबंदर, देवुसिंह चौहान - खेडा (सर्व गुजरात), जितेंद्र सिंह - उधमपूर (जम्मू व काश्मीर), श्रीमती अन्नपूर्णा देवी - कोडरम, अर्जुन मुंडा - खुंटी (दोन्ही झारखंड), व्ही मुरलीधर - अट्टिंगल, राजीव चंद्रशेखर - तिरुअनंतपुरम (दोन्ही केरळ), ज्योतिरादित्य शिंदे - गुना, फग्गनसिंग कुलस्ते - मंडला (दोन्ही मध्यप्रदेश), अर्जुनराम मेघवाल - बिकानेर, भूपेंद्र यादव - अलवर, गजेंद्रसिंह शेखावत - जोधपूर, कैलाश चौधरी - बाडमेर (सर्व राजस्थान), जी. किशन रेड्डी - सिकंदराबाद (तेलंगण), अजय भट्ट - नैनीताल (उत्तराखंड), अजय मिश्रा टेनी - खेरी, कौशल किशोर- मोहनलाल गंज, स्मृती इराणी - अमेठी, साध्वी निरंजन ज्योती - फतेहपूर, पंकज चौधरी - महाराजगंज, महेंद्रनाथ पांडे - चंदौली (सर्व उत्तरप्रदेश), निशिथ प्रामाणिक - कूचबिहार शांतनु ठाकूर - बनगाव, सुभाष सरकार - बांकुडा (सर्व पश्चिम बंगाल), संजय बालियान - मुझफ्फरनगर ( उत्तरप्रदेश),

उमेदवारी नाकारलेले खासदार

मीनाक्षी लेखी - (नवी दिल्ली), साध्वी प्रज्ञा ठाकूर (भोपाळ), रमेश बिधुडी (दक्षिण दिल्ली), डॉ. हर्षवर्धन (चांदणी चौक), प्रवेश वर्मा (पश्चिम दिल्ली), कृष्णपाल सिंह यादव (गुना), ज्योत्स्ना महंत (कोरबा), रमाकांत भार्गव (विदिशा)

१९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

  • २८ - महिला उमेदवार

  • २७ - अनुसूचित जाती

  • १८ - अनुसूचित जमाती

  • ५७ - इतर मागासवर्गीय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com