Explained: तुमचं लक्षही नव्हतं अन् लोकसभेत ३ मिनिटांत मोठा निर्णय! २:१२ ला सादर, २:१५ ला मंजूर; प्रत्येकाच्या कामाची माहिती

Lok Sabha Passes Taxation and Other Laws Amendment Bill 2026 in Just Three Minutes Without Debate : लोकसभेत कोणतीही चर्चा न होता अवघ्या तीन मिनिटांत 'कर आकारणी आणि इतर कायदे (सुधारणा) विधेयक, २०२६' मंजूर झाले; या विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदी जाणून घ्या.
Lok Sabha Passes Tax Amendment Bill in Just 3 Minutes

Lok Sabha Passes Tax Amendment Bill in Just 3 Minutes

esakal

Updated on

मंगळवारी (४ ऑगस्ट) लोकसभेत अत्यंत वेगाने एका महत्त्वाच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. अयोध्येतील राम मंदिरातील प्रसाद चोरीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाचे खासदार सभागृहात घोषणाबाजी आणि गोंधळ करत असताना ही प्रक्रिया पार पडली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दुपारी २:१२ वाजता 'कर आकारणी आणि इतर कायदे (सुधारणा) विधेयक, २०२६' सभागृहात मांडले आणि कोणतीही चर्चा न होता अवघ्या तीन मिनिटांत, म्हणजेच दुपारी २:१५ वाजता ते मंजूर करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com