ADR Report Reveals Richest MP
esakal
लोकसभेत कोट्यधीश खासदारांची संख्या मोठी असली, तरी सरासरी संपत्तीच्या बाबतीत राज्यसभेतील खासदार अधिक श्रीमंत असल्याचे समोर आले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR)च्या नव्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, राज्यसभेतील विद्यमान खासदारांची सरासरी संपत्ती ११५.२५ कोटी रुपये आहे. त्याच्या तुलनेत लोकसभा खासदारांची सरासरी संपत्ती ४६.३४ कोटी रुपये आहे.