दारूचा खंबा हातात पडला अन् लागला की...

वृत्तसंस्था
Tuesday, 5 May 2020

राज्य सरकारने नियमावली घालून दारूच्या दुकानांना परवानगी दिल्यानंतर अनेक तळीराम दुकानांसमोर गर्दी करून दारू मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दारूची दुकाने सुरू झाल्यानंतर विविध ठिकाणचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

चेन्नईः राज्य सरकारने नियमावली घालून दारूच्या दुकानांना परवानगी दिल्यानंतर अनेक तळीराम दुकानांसमोर गर्दी करून दारू मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दारूची दुकाने सुरू झाल्यानंतर विविध ठिकाणचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पहिल्या तळीराम ग्राहकाचा हार घालून सत्कार!

विविध ठिकाणी दारूच्या दुकानांसमोर अद्यापही मोठ-मोठ्या रांगा लागल्या आहेत. रागांची छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. फोटो व व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तळीरामाला दारू मिळाल्यानंतर त्याने दोन्ही हातात खंबे धरून नाचायला सुरवात केल्याचे पाहायला मिळत आहे. बेळगाव येथे तर एका दुकानदाराने तळीरामाच्या गळ्यात हार घालून सत्कार केला होता.

दरम्यान, केरळ आणि मध्य प्रदेशातील दारूची दुकान अद्याप बंद ठेवण्यात आलेली आहेत. गोव्यातील दुकाने सोमवार पासून सुरू करण्यात आली आहेत. पण, तेथे मास्क नाही तर दारू नाही, अशी युक्ती वापरण्यात आली. कर्नाटकातील काही भागातील दारूची दुकान सुरू झाल्यावर तळीरामांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या ठिकाणी दारूच्या दुकानांसमोर गर्दी दिसत आहे. तमिळनाडू सरकारने 7 मे पासून दारूची दुकाने सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र रेड झोनमधील दारूची दुकाने सुरू करण्याच्या शक्यतेला सरकारने नकार दिला आहे.

...म्हणून सपना चौधरीच्या गाण्यावर करायला लावला डान्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man started dancing when he got liquor bottles after long wait in the queue outside the shop