गरीब मुलगा पंतप्रधान झाल्याचं काॅंग्रेसला सहन होईना,संबित पात्रांचं राहुल गांधींवर टीकास्त्र | Sambit Patra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi, Sambit Patra And Rahul Gandhi

गरीब मुलगा पंतप्रधान झाल्याचं काॅंग्रेसला सहन होईना,संबित पात्रांचं राहुल गांधींवर टीकास्त्र

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील सुरक्षेवरुन खासदार संबित पात्रा (Sambit Patra) यांनी राहुल गांधी व काँग्रेस पक्षावर घणाघाती टीका केली आहे. पात्रा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, राहुल गांधी (Rahul Gandhi) अँड कंपनीला एका गरीब परिवारातील मुलगा आणि १३५ कोटी देशवासीयांच्या आशा तथा आकांक्षांना पूर्ण करणारा पंतप्रधान सहन होईना. पात्रा यांना सोहेल अहमद मलानी यांनी प्रश्न केला, की गरीब परिवारातील भाग्यवान मुलगा -

१. १० लाखांचा सुट, दोन लाखांचा चष्मा घालतो.

२. मशरुमची भाजी आणि काजूची रोटी खातो

३. १२ कोटींच्या गाडीत फिरतो

४. ८५०० कोटींचे खासगी विमान बाळगतो.

५. परदेश दौऱ्यात आणि जहिरातींवर जनतेचा अब्जावधी रुपये खर्च करुन टाकतो, ईश्वराने यांचासारखा गरीब सर्वांना करावा. (Sambit Patra Criticize Rahul Gandhi Over PM Narendra Modi Security Issue)

हेही वाचा: PM मोदींच्या सुरक्षेवरुन अनुपम खेर म्हणाले - देव तारी, त्याला कोण मारी!

नितीन शर्मा यांनी लाॅकडाऊन आणि सिंघू सीमेवरील छायाचित्रे टाकून पात्रा यांना विचारले, की यांच्या वेदनांची आठवण पात्रा जी तुम्हाला आहे का?, नाही म्हटल आठवण करुन द्यावी. नवीन कथा यावेळी यूपीतून लिहिली जाईल, यावेळेस खदेडा होबे.

हेही वाचा: PM मोदी पुलावर अडकल्यानंतर भाजपची आगपाखड; CM चन्नी म्हणतात..

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटींवरुन सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षापासून, क्रीडा ते बाॅलीवूडमधील दिग्गजांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र काहींना दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आज गुरुवारी (ता.सहा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन पंजाबमधील घडलेला प्रकार सांगितला. या प्रसंगी मोदी यांनी राष्ट्रपतींविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. याबाबत मोदींना सोशल मीडियावरुन सांगितले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PM Narendra Modi
loading image
go to top