
आजच्या जगात आपल्यासाठी स्मार्टफोन (smartphone) हे एक महत्वाचं गॅजेट बनलं आहे. ई-मेल, कॉन्टॅक्ट, खासगी डेटा, बॅकिंग आणि क्रेडिट-डेबिट कार्ड हे सर्वकाही आता केवळ एका स्मार्टफोनमध्ये सामावलं आहे. त्यामुळे फोनशिवाय आपली महत्वाची कामं होऊच शकत नाहीत, इतकं त्याचं आपल्या जीवनात महत्वाचं स्थान बनलं आहे. आपली लाईफलाईनच बनलेला हा फोन हरवतो तेव्हा आपण पूर्णपणे हतबल होऊन जातो. मात्र, आता हतबल होण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. कारण हरवलेला फोन शोधण्याचं नवं तंत्र आता अॅपल (Apple) आणि गुगलने (Google) आणलं आहे.
सरकारला जमलं नाही ते सोनू सूद करुन दाखवणार; जाणून घ्या काय आहे त्याची योजना?
हरवलेला फोन शोधण्यासाठी किंवा फोन चोरीला जाऊ नये यासाठी अॅपल आणि गुगलने आणलेलं नवं सिस्टिम टूल म्हणजे 'फाईंड माय फोन' (Find My Phone). जर तुमचा फोन काहीही केल्या सापडत नसेल तर तो या खास टूलच्या मदतीने कसा शोधाल हे या बातमीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कसा शोधाल तुमचा हरवलेला स्मार्टफोन ?
हरवलेला फोन शोधण्यासाठी, लॉक करण्यासाठी किंवा फोनमधील डेटा पुसून टाकण्यासाठी युजरने आपल्या हरवलेल्या फोनमध्ये गुगल अकाऊंटला लॉगिन केलेलं गरजेचं आहे. तसेच हा फोन मोबाईल डेटाशी किंवा वायफायशी कनेक्टेड असणं गरजेचं आहे. जेणेकरुन तो गुगल प्ले स्टोअरवर दिसू शकेल. तसेच या फोनची लोकेशन सेटिंग्ज ऑन असणं गरजेचं असून त्यातील फाईंड माय डिव्हाईसचं सेटिंगही ऑन असणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी फोनमध्ये व्यवस्थित सेट असतील तर तुम्हाला फोन मिळण्यात अडचण येणार नाही.
NOTA ला सर्वाधिक मतं मिळाल्यास निवडणूक रद्द व्हावी?; सुप्रीम कोर्टाची केंद्र, निवडणूक आयोगाकडे विचारणा
फोन शोधण्यासाठी तुम्हाला android.com/find या लिंकवर जाऊन त्याच्या गुगल अकाऊंटमध्ये लॉगिन करणं गरजेचं आहे. एकदा यामध्ये साईन इन केलं की युजरला आपला फोन स्क्रिनच्या वरती डाव्या कोपऱ्यात दिसेल. जर तुमच्याकडे याच अकाऊंटने अनेक फोन असतील तर जो फोन हरवला आहे तो सिलेक्ट करा. यानंतर या फोनची बॅटरी लाईफ, अॅक्टिव्ह वायफाय कनेक्शन आदी गोष्टी तुम्हाला दिसतील. त्यानंतर गुगल या फोनचं जवळपास जाणारं लोकेशन गुगल मॅपवर शोधेल. यामध्ये युजर फोनचं शेवटचं लोकेशनं देखील पाहू शकतात. त्याचबरोबर युजरला आपल्या हरवलेल्या फोनवर पाच मिनिटांसाठी एखादं गाणही वाजवता येऊ शकेल, ज्यामुळे फोन नेमकेपणानं शोधण्यास मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.