
जे सरकारला जमू शकलं नाही ते आता अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) करुन दाखवणार आहे. होय हे खरं आहे, कारण सोनूनेच आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबत घोषणा केली आहे. देशात सध्या बेरोजगारीचा (Unemployment) प्रश्न तीव्र होत चालला आहे. या समस्येतून काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न अभिनेता सोनू सूद करत आहे. सोनूने आपल्या ट्विटर हँडलवरुन एक लाख गरजू लोकांना नोकऱ्या देणार असल्याचं तसेच १० कोटी लोकांचं आपण जीवन बदलणार असल्याचं म्हटलं आहे. यासाठी त्यानं नियोजनही केलं आहे, यामागची काय आहे योजना जाणून घ्या.
सोनूने ट्विटमध्ये म्हटलं, "एक लाख लोकांसाठी नोकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या या कामाच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांमध्ये सुमारे १० कोटी लोकांचं जीवन बदलण्यासाठी आपण काम करत आहोत"
रोजगारासाठी 'गुड वर्कर' अॅप करा डाऊनलोड
ज्या १ लाख नोकऱ्या देण्याचा दावा सोनूने आपल्या ट्विटमधून केला आहे. त्या मिळवण्यासाठी 'गुड वर्कर' अॅप (Good Worker App) डाऊनलोड करणं आवश्यक असल्याचं सोनूनं म्हटलं आहे. सोनू म्हणतो, "नव्या वर्षाची नवी आशा, नव्या नोकरीची संधीही....या संधींना तुमच्याजवळ घेऊन येत आहोत. 'प्रवासी रोजगार' बनलंय आता 'गुड वर्कर'. आजच 'गुड वर्कर' अॅप डाऊनलोड करा आणि चांगल्या भविष्याची खात्री बाळगा, असा मजकूर लिहित त्याखाली सोनूने एक लिंकही दिली आहे. या लिंकसोबत त्यांनी मजेशीर हॅशटॅगही दिले आहेत. यामध्ये #AbIndiaBanegaKaamyaab, #GoodWorker, #NaukriPaanaHuaAasaan या हॅशटॅगचा समावेश आहे.
सोनू सूदच्या कामगिरीचं कौतुक
सोनू सूदच्या ट्विटने हजारो-लाखो बेरोजगारांमध्ये नवी आशा जागवली आहे. त्याच्या या कामाचं लोक तोंडभरुन कौतुकही करत असून त्याला धन्यवाद देत आहेत. सोनूने म्हटलं की, आजवर या मोहिमेद्वारे १ लाख २० हजार ५२ लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. आता १ लाख लोकांसाठी ते पुन्हा नव्या संधी घेऊन आलो आहेत.
तुमचा स्मार्टफोन हरवलाय? काळजी करु नका! ही ट्रिक वापरुन आपला फोन तुम्ही स्वतःच शोधा
लॉकडाउनच्या काळात अडकलेल्या लोकांना दिला होता मदतीचा हात
सोनू सूदने कोरोना लॉकडाउनच्या काळात मुंबईत अडकून पडलेल्या लोकांना आपापल्या राज्यांमध्ये पाठवण्यासाठी व्यक्तीगतरित्या प्रयत्न केला होता. सोनू सूदने देशभरातच नव्हे तर परदेशांत अडकलेल्या लोकांनाही आपल्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी मदत केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.