ध्वनिवर्धक परिसरापुरतेच घुमले नाही तर कारवाई : योगी आदित्यनाथ

आमच्या सरकारने राज्यात धार्मिक ठिकाणी निकषांचा भंग करून लावण्यात आलेले ध्वनिवर्धक काढण्यात आले
loudspeakers around the premises only otherwise action Yogi Adityanath
loudspeakers around the premises only otherwise action Yogi AdityanathSakal

लखनौ : ध्वनीवर्धकांचा आवाज ते जेथे लावले आहेत त्या परिसरातपुरताच मर्यादित असला पाहिजे, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला.आढावा बैठकीत ते म्हणाले की, आमच्या सरकारने राज्यात धार्मिक ठिकाणी निकषांचा भंग करून लावण्यात आलेले ध्वनिवर्धक काढण्यात आले आहेत. याबाबत आम्ही सौहार्दाने उदाहरण निर्माण केले आहे. भविष्यातही ही स्थिती कायम राहील.राज्यात कुठेही अनावश्यक ध्वनिवर्धक लावण्यात आले असतील आणि ध्वनिवर्धक मोठ्याने लावले जात असल्याबाबत तक्रारी आल्यास तुमच्याविरुद्ध कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांना बजावण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

याबाबत मंडळ अधिकारी, उपायुक्त आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई होईल.राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेले अवैध वाहनतळ दोन दिवसांत बंद करण्यात यावेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे, अन्यथा उत्तरदायित्व निश्चीत करून कारवाई केली जाईल, असेही योगींनी सांगितले.

ईद, रामनवमी आणि अक्षय तृतीया हे सण शांततेत साजरे झाले. त्यामुळे एक सकारात्मक संदेश दिला गेला आहे.

- योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com