कोरोना नाही 'प्रेमरोग' झालाय; लव्ह मॅरेजसाठी १५०० पोरींचं पलायन!

उज्ज्वल कुमार
Friday, 29 January 2021

कोरोनाकाळात लोक घरात कोंडलेले असताना याच काळात म्हणजे गेल्या वर्षी मार्च ते ऑक्टोबरपर्यंत एक हजार ६७० मुलींनी घरातून पलायन केल्याची नोंद बिहार पोलिसांनी केली आहे. प्रेमाच्या शोधात या मुलींनी घर सोडले आहे, असे पोलिसांच्या अहवालात नमूद केले आहे.

पाटणा - कोरोनाकाळात लोक घरात कोंडलेले असताना याच काळात म्हणजे गेल्या वर्षी मार्च ते ऑक्टोबरपर्यंत एक हजार ६७० मुलींनी घरातून पलायन केल्याची नोंद बिहार पोलिसांनी केली आहे. प्रेमाच्या शोधात या मुलींनी घर सोडले आहे, असे पोलिसांच्या अहवालात नमूद केले आहे.

लॉकडाउनमध्ये सर्वजण घरात असताना प्रेमाखातर मुलगी पळून गेल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. कोरोनाच्या भीतीमुळे सर्वांनी घरात थांबण्यास प्राधान्य दिलेले असताना,  प्रेमी युगुल मात्र उंबरठा ओलांडण्याचे धाडस करीत होते. बिहार पोलिसांनी मार्च ते ऑक्टोबर या काळात घरातून पळून गेलेल्या मुलींची जी आकडेवारी, त्यावरून युवा पिढी ही कोरोनापेक्षा ‘प्रेमरोगा’ने पछाडलेली दिसत आहे. भारतात मार्चमध्ये कोरोनाचा प्रसार सुरू होण्यास प्रारंभ झाल्याने देशभरात लॉकडाउन जाहीर झाले होते. याच महिन्यात ‘प्रेमासाठी वाट्टेल’ असे म्हणत ३०८ मुली घरातून पळून गेल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जूनपासून संख्येत वाढ
मार्चनंतर लॉकडाउनमधील निर्बंध कडक केल्याने पलायनाच्या संख्याही घटल्याचे दिसून आली. या कालावधीत केवळ ६३ मुली घरातून निघून गेल्या. जूनपासून मात्र ही संख्या वाढली आहे. जूनमध्ये २३२, जुलैत २१९, ऑगस्टमध्ये २५५ आणि ऑक्टोबरमध्ये २५६ तक्रारींची नोंद राज्यातील विविध पोलिस स्थानकांमध्ये झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये बिहारमधील कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने अनेक क्षेत्रांतील कारभार सुरू झाला. जनजीवन सुरळीत झाले.

शेतकरी आंदोलन मिटणार? यूपी गेटवर कलम 144'; राकेश टिकैत मागण्यांवर ठाम

पाटण्यातही तक्रारी
बिहारमध्ये पळून गेलेल्या प्रेमीयुगुलांची जी आकडेवारी आहे, त्यात पाटणाही मागे नाही. राजधानीत ‘बेपत्ता’च्या मार्चमध्ये १०३, एप्रिलमध्ये २४, मे महिन्यात ४८, जूनमध्ये ९१, जुलैत ७१, ऑगस्टमध्ये ८२, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अनुक्रमे ९० व ९३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. प्रेमापोटी पळून जाणारे आहेत, त्याचप्रमाणे विवाह करण्यासाठी घर सोडल्याच्याही घटना आहेत. पाटण्यात अशा प्रकारच्या ६०२ तक्रारी नोंदविल्या आहेत. विभागातील अन्य जिल्ह्यांपेक्षा ही संख्या जास्त आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Love Marriage Girl Missing Bihar Police Crime