आई, एकदातरी आम्हाला जवळ घे ना; पण नाही...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

दोन मुले आपल्या आईला विनवणी करत होते. आई आम्हाला एकदातरी जवळ घे ना. पण, मुलांकडे तिने पाहिलेही नाही. तिला नवरा आणि मुलांपेक्षा प्रियकर महत्वाचा होता. प्रियकरासोबत गेली अन् मुलं अश्रू ढाळत बसल्याची घटना येथे घडली.

अलीगढ (उत्तर प्रदेश): दोन मुले आपल्या आईला विनवणी करत होते. आई आम्हाला एकदातरी जवळ घे ना. पण, मुलांकडे तिने पाहिलेही नाही. तिला नवरा आणि मुलांपेक्षा प्रियकर महत्वाचा होता. प्रियकरासोबत गेली अन् मुलं अश्रू ढाळत बसल्याची घटना येथे घडली.

बांकनेर गावामधील प्राथमिक शाळेत शिकवण्याचे काम शिक्षिका करत होती. शाळा सुटल्यानंतर सहशिक्षिकेसह घरी परतत होती. यावेळी एक पांढरी मोटार जवळ आली व शिक्षिकेचे फिल्मी स्टाईलने अपहण करण्यात आले होते. संबंधित शिक्षिका विवाहीत होती. तिच्या पतीने पोलिसांकडे अपहरणाची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान शिक्षिकेचे एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधामधून दोघे पळून गेल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. शिवाय, दोघांच्याही मोबाईलचे लोकेशन एकाच ठिकाणी आढळले होते. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर शिक्षिकेच्या घरच्यांनी तिची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली होती. परंतु, शिक्षिकीने ती फेटाळली होती. पोलिसांनी शिक्षिकेला न्यायालयात हजर केले. यावेळी तिने प्रियकरासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली.

न्यायालयात सुनावणीवेळी तिची दोन्ही मुले, पती, सासू-सासरे व नातेवाईक उपस्थित होते. अनेकांनी तिची समजूत काढली पण तिने कोणाचेही ऐकले नाही. न्यायालयामधून बाहेर पडताना आई आम्हाला जवळ घे म्हणून रडत होती. परंतु, तिने मुलांकडे पाहिलेही नाही. प्रियकराचा हात धरत पुढे निघून गेली. मुले मात्र मोठमोठ्याने रडत होती. दोन्ही मुलांना जवळ घेत पती तिच्याकडे पाहात होता, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. दरम्यान, शिक्षिकेचे अपहरण झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्‌विट करून चौकशी करण्याची मागणी केली होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: love not even looked at husband and children at up