मेहुणीवर जडला जीव, तिला मिळवण्यासाठी पती मध्यरात्री करायचा तंत्र-मंत्र; पत्नीने पुढे काय केलं वाचा!

महिलेचे लग्न जगदीशपुरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीशी २०१३ मध्ये झाले होते. त्यांना दोन मुलं देखील आहेत.
crime news
crime news

लखनऊ- उत्तर प्रदेशच्या आग्रामधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. मेहुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी पती रात्री १२ वाजता तंत्र-मंत्र करायला लागतो. रात्री दोन वाजेपर्यंत हा प्रकार सुरु असतो. त्यानंतर पती मला मारहाण करतो असा दावा एका महिलेने केला आहे. याप्रकरणी महिलेने पोलीस कमिशरकडे तक्रार केली आहे.

व्यक्तीच्या पत्नीच्या बहिणीचे लग्न त्याच्याच छोट्या भावाशी झालेलं आहे. पती नेहमी रात्री मंत्र-तंत्र करत होता. या सर्वाला कंटाळलेल्या पत्नीने पोलिसांकडे व्यथा मांडली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाने महिलेची तक्रार कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे ट्रान्सफर केली आहे. (love on sister in law mantra tantra from husband Read what the wife did next up agra news)

crime news
Nagpur Slaughtering Crime: बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, ९ जणांवर गुन्हे; ८०० किलो मांस जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे लग्न जगदीशपुरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीशी २०१३ मध्ये झाले होते. त्यांना दोन मुलं देखील आहेत. एक सात वर्षाचा तर दुसरा नऊ वर्षाचा असा त्यांचा सुखी संसार होता. लग्नानंतर चारवर्षापर्यंत सर्वकाही सुरळीत सुरु होतं. पण, २०१७ पासून सगळं बदललं.

पतीला तांत्रिक विद्येचा नाद लागला. यावरुन पती-पत्नीमध्ये टोकाचे वाद होऊ लागले. पती पत्नीला मारत होता असाही आरोप आहे. पत्नीने दावा केलाय की, 'तिच्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी पती तंत्र-मंत्र करत आहे.' पत्नीचा याला विरोध असल्याने तो तिला मारहाण करतो. २०२० मध्ये पतीने अशीच मारहाण करुन पत्नीला घराबाहेर हाकाललं होतं.

crime news
Dhule Crime News : पोलिस पथकांकडून गांजा जप्त; महामार्गावर मुंबईला जाणारा 6 लाखांचा मुद्देमाल हाती

२०२० मध्ये महिला आपल्या माहेरी गेली. पण, कधीकधी ती सासरी येत होती. पण, पतीमध्ये काहीही सुधारणा दिसून न आल्याने ती कायमसाठी माहेरी राहू लागली. महिलेने सांगितलं की, पती तंत्र-मंत्र विद्येसाठी वेडा झाला होता. त्याचा माझ्या बहिणीवर जीव जडला होता. तिला आपलं करण्यासाठी तो मंत्रतंत्र करु लागला. महिलेच्या बहिणीचे लग्न पतीच्या छोट्या भावाशी झाले होते. दुसरीकडे, व्यक्तीने मारहाण केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com