प्रेयसीने लैंगिक संबंधानंतर मागितले पैसे तर...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

दोघांचे एकमेकांवर प्रेम. दोघांचे लैंगिक संबंध झाल्यानंतर प्रेयसीने त्याच्याकडे 500 रुपये मागितले. यामुळे चिडलेल्या प्रियकराने तिची गळा दाबून हत्या केल्याची घटना येथे घडली.

कोरबा (छत्तीसगड): दोघांचे एकमेकांवर प्रेम. दोघांचे लैंगिक संबंध झाल्यानंतर प्रेयसीने त्याच्याकडे 500 रुपये मागितले. यामुळे चिडलेल्या प्रियकराने तिची गळा दाबून हत्या केल्याची घटना येथे घडली. पोलिसांनी या घटनेचा शोध घेत प्रियकराला अटक केली.

पोलिसावर जडले मेव्हणीचे प्रेम अऩ्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरबा पोलिस स्टेशनच्या हद्दीत ग्राम अखरपाली येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतामध्येच हा मृतदेह होता. पोलिसांना तपास सुरू केल्यानंतर मृत महिलेचे चंद्र विजय नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. चंद्र विजयला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. अखेर त्याने खुनाची कबुली दिली. महिलेची हत्या करण्याआधीच दोघांमध्ये शारिरिक संबंध झाले होते. त्यानंतर या महिलेने चंद्र विजयकडे 500 रुपये मागितले होते. पैशावरून दोघांमध्ये वाद झाला. मारहाणीतून त्याने महिलेचा गळा दाबला यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. महिलेची ओळख पटू नये, म्हणून तिच्या चेहरा दगडाने ठेचून काढला.

'त्या'वेळी पत्नी प्रियकराच्या कुशीत होती...

कोरबाचे पोलिस अधिकारी राहुल देव शर्मा यांनी सांगितले की, 'दोघांचे शारिरीक संबंध होते. शारिरीक संबंधानंतर महिलेने 500 मागणी केली. संशयित आरोपीने 500 रुपये देण्यास नकार दिला होता. यानंतर महिलेने त्याच्या नातेवाईकाला प्रेमसंबंधाबद्दल सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे चंद्र विजय याने महिलेला मारहाण करून खून केला. महिलेच्या मृतदेहापासून श्वानाने आरोपीच्या घरापर्यंत माग काढला. यामुळे आरोपीचा शोध लागला.'

बास, मी आता जगूच शकत नाही...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lover kills girlfriend for only 500 rupees at korba in chhattisgarh