'त्या'वेळी पत्नी प्रियकराच्या कुशीत होती...

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

पतीच्या मोबाईलवर अनोळखी फोन आला, तुझ्या पत्नीचे अपहरण करण्यात आले आहे. पतीने तत्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर एका हॉटेलमध्ये असल्याचे समजले. घटनास्थळी गेल्यानंतर ती प्रियकराच्या कुशीत आढळून आली.

कोलकताः पतीच्या मोबाईलवर अनोळखी फोन आला, तुझ्या पत्नीचे अपहरण करण्यात आले आहे. पतीने तत्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर एका हॉटेलमध्ये असल्याचे समजले. घटनास्थळी गेल्यानंतर ती प्रियकराच्या कुशीत आढळून आली.

प्रियकर हेल्थ बॅण्डमुळे नको त्या अवस्थेत सापडला...

पोलिसांनी याप्रकरणी राम पवेश उर्फ शेख दिवान याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एक व्यक्ती चौकीत आली व पत्नीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. तक्रारवेळी सांगितले की, प्रथम पत्नीने फोन केला व एक अनोळखी व्यक्ती घरी आली असून, तुमचा अपघात झाल्याचे सांगत आहे. तुमची माहिती घेण्यासाठी फोन केला. यानंतर पत्नीने फोन कट केला. पण, काही वेळानंतर परत अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. तुझ्या पत्नीचे अपहरण केले आहे. तत्काळ घरी आलो तर पत्नी घरी नव्हती. यामुळे घाबरून गेलो. पत्नीचा शोध घेतला पण ती सापडली नाही. अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.'

Video: प्रेयसीचा पती घरी आला अन् तो नग्नावस्थेत लटकला...

'महिलेच्या अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर शोध सुरू केला. तपासादरम्यान महिला एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली. महिलेच्या पतीला सोबत घेऊन हॉटेलमध्ये गेल्यानंतर महिला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत होती. दोघांकडे चौकशी केल्यानंतर संबंधित व्यक्ती तिचा प्रियकर होता. दोघांचे प्रेमसंबंध असून, एक वर्षापूर्वीही त्याच्यासोबत ती पळून गेल्याची माहिती मिळाली,' असे पोलिसांनी सांगितले.

माझा तिच्यावर बलात्कार करून झालाय; तुम्ही पण या...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wife found with lover in hotel at kolkata