LPG Gas Cylinder Price: सर्वसामान्यांना दिलासा! LPG गॅसच्या दरांत मोठी घट, जाणून घ्या दर

1 जून 2023 पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे
LPG Gas Cylinder Price
LPG Gas Cylinder PriceEsakal

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी बातमी आहे. एलपीजी गॅसच्या किमतींत मोठी घट झाली आहे. त्यामुळे खिशावरील भार काहीसा हलका होणार आहे. एलपीजी विकणाऱ्या कंपन्यांकडून दर स्वस्त करण्यात आले आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीत मोठी कपात झाली आहे.

घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर पूर्वीप्रमाणेच असतील. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागील महिन्यात (1 मे 2023 रोजी) व्यावसायिक गॅसच्या किमतींत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती. तर, आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हाच सिलेंडर 1856.50 रुपयांना होता.

घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मार्चमध्ये घरगुती सिलेंडरच्या किमतींत बदल करण्यात आला होता. त्यानंतर घरगुती सिलेंडरच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती एलपीजीच्या किमती मुंबईमध्ये 1102.5 रुपये, दिल्लीमध्ये 1103 रुपये, जयपूरमध्ये 1106.5, बंगळुरूमध्ये 1105.5 रुपये, लेहमध्ये 1340, भोपाळमध्ये 1108.5, आणि श्रीनगरमध्ये 1219 रुपये इतकी किमत आहे.

LPG Gas Cylinder Price
Sakal Podcast: अहमदनगरचं नामांतरण ते मोदीजी तर देवालाही समजावतील, राहुल गांधींचा टोला

गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅसचा दर 1856.50 रुपये प्रति सिलेंडर होता. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1103 रुपये आहे यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 1 जूनपासून, बदललेल्या व्यावसायिक गॅस सिलेंडर दिल्लीमध्ये 1773 रुपयांना विकला जात आहे. आणि 1 जून रोजी कोलकातामध्ये 1875.50 रुपयांना मिळत आहे.

LPG Gas Cylinder Price
Rahul Gandhi : मोदी देवाला जग चालवायला शिकवतील; राहुल गांधी यांचा टोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com