

New LPG Rule
esakal
नवी दिल्ली: भारत सरकारने घरगुती गॅस पुरवठ्यात महत्त्वपूर्ण बदल घडवला आहे. आता एकाच घरात एलपीजी सिलिंडर आणि पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) कनेक्शन दोन्ही ठेवणे बेकायदेशीर ठरले आहे. ‘एक घर, एक कनेक्शन’ या धोरणाची कठोर अंमलबजावणी सुरू झाली असून, दुहेरी कनेक्शन असणाऱ्या घरांना लक्ष्य केले जाणार आहे. जागतिक ऊर्जा संकट आणि पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.