Paytm Payments Bank: पेटीएम वॉलेटला मोठा झटका! ग्राहकांची संख्या झाली कमी; कोणाला झाला फायदा?

Paytm Payments Bank Crisis: पेटीएम पेमेंट्स बँकेवरील कारवाईमुळे, त्यांच्या मोबाइल वॉलेट व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. आरबीआयच्या आदेशानुसार पेटीएम पेमेंट्स बँक नवीन ग्राहक जोडू शकत नाही. गेल्या तीन महिन्यांत या प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी घट झाली आहे.
Paytm Payments Bank’s wallet business fading fast as restrictions bite
Paytm Payments Bank’s wallet business fading fast as restrictions bite Sakal

Paytm Payments Bank Crisis: पेटीएम पेमेंट्स बँकेवरील कारवाईमुळे, त्यांच्या मोबाइल वॉलेट व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. आरबीआयच्या आदेशानुसार पेटीएम पेमेंट्स बँक नवीन ग्राहक जोडू शकत नाही. गेल्या तीन महिन्यांत या प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी घट झाली आहे. खरं तर, ग्राहक हळूहळू पेटीएम पेमेंट्स बँकेच्या वॉलेट इकोसिस्टममधून बाहेर पडत आहेत.

पेटीएम पेमेंट्स बँकेचे वॉलेट सप्टेंबर 2023 मध्ये 60.7 कोटी होते, जे मार्च 2024 मध्ये कमी होऊन 59.7 कोटी झाले. या कालावधीत Amazon Pay चे वॉलेट 6.4 कोटी वरून 6.6 कोटी, Mobikwik चे 13.1 कोटी वरून 13.5 कोटी, PhonePe चे 15.2 कोटी वरून 19.4 कोटी आणि Slice चे 1.3 लाख वरून 20 लाख पेक्षा जास्त झाले आहेत.

आरबीआयच्या आदेशानुसार, पेटीएम पेमेंट बँक खाती (बचत आणि प्रीपेड दोन्ही खाती) फक्त पे-आउट व्यवहारांसाठी वापरली जाऊ शकतात पण युजर त्यात पैसे जोडू शकत नाहीत. मार्चमध्ये पेटीएम पेमेंट्स बँक वॉलेटद्वारे 4,163 कोटी रुपयांचे व्यवहार केले गेले, जे डिसेंबर 2023 मधील 13,997 कोटी रुपयांपेक्षा 70% कमी आहे. आरबीआयने 31 जानेवारी रोजी पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली होती.

Paytm Payments Bank’s wallet business fading fast as restrictions bite
Government Employees: केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिली मोठी भेट! आता पगारात होणार आणखी वाढ

मूलभूत बँकिंग सेवा बंद करण्यासाठी सुरुवातीला फेब्रुवारी अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र नंतर ही मुदत 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती.

पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल) मध्ये केवायसीशिवाय लाखो खाती होती. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये एका पॅन कार्डचा वापर अनेक खाती उघडण्यासाठी करण्यात आला होता. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले होते. यातून मनी लाँड्रिंग होण्याचीही शक्यता आहे.

Paytm Payments Bank’s wallet business fading fast as restrictions bite
Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

अहवालानुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेकडे सुमारे 35 कोटी ई-वॉलेट होते. त्यापैकी सुमारे 31 कोटी निष्क्रिय होते. अशी लाखो खाती आहेत ज्यात केवायसी झालेले नाही. PPBL वर RBI ला चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप आहे. या खात्यांमधून संशयास्पद व्यवहार आढळून आले आहेत. या आधारे आरबीआयने कारवाई केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com