LPG Price Hike
LPG Price Hikeesakal

LPG Price Hike: दिवाळी सणापूर्वी मोठा धक्का... LPG सिलिंडर महागला, जाणून घ्या किती रुपयांनी वाढली किंमत?

आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल झाला आहे.
Published on

आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल झाला आहे. दर महिन्याला पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती निश्चित केल्या जात असतात. तेल कंपन्यांनी नोव्हेंबर महिन्यासाठी दर जाहीर केले असून गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे.

आजपासून एलपीजी सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता 1785.50 रुपये झाली आहे. ऑक्टोबरमध्ये हा दर 1684 रुपये होता.

LPG Price Hike
Belgaum Black Day : बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागात आज काळा दिन; महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेशबंदी!

पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. 1 नोव्हेंबर 2023 पासून 19 किलोचा एलपीजी गॅस सिलिंडर 100 रुपयांनी महाग झाला आहे. मात्र, 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

LPG Price Hike
Maratha Reservation : शिंदे समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू नव्याने ‘इम्पिरिकल डेटा’ गोळा करणार

आता एका सिलिंडरची किंमत एवढी

IOCL च्या वेबसाइटनुसार, आजपासून राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक LPG सिलेंडर 1,833 रुपयांना मिळेल, जो पूर्वी 1731 रुपयांना मिळत होता. तर मुंबईत त्याची किंमत 1785.50 रुपये झाली आहे, जी पूर्वी 1684 रुपये होती. कोलकाता येथे 1839.50 रुपयांऐवजी 1943.00 रुपयांना मिळेल, तर चेन्नईमध्ये त्याची किंमत 1999.50 रुपये झाली आहे, जी आतापर्यंत 1898 रुपये होती.

LPG Price Hike
Maratha Reservation : मराठा आंदोलनामुळं कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा बंद; प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय, बसस्थानकांत शुकशुकाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com