LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

LPG Tanker Simi Reaches Kandla Port With 20,000 Tonnes Gas Amid Hormuz Tension : इराण-अमेरिका तणाव, अमेरिकन नाकेबंदी आणि इराणी नौदलाच्या कडक नजरेतून मार्ग काढत ‘सिमी’ भारतात; राष्ट्रीय एलपीजी साठ्यावरचा दबाव कमी करण्यास मदत
LPG

LPG

esakal

Updated on

गुजरातमधील कांडला येथील दीनदयाळ बंदरात रविवारी सकाळी मार्शल आयलंड्सचा ध्वज असलेले एलपीजी मालवाहू जहाज ‘सिमी’ सुरक्षितपणे दाखल झाले. या जहाजात सुमारे २०,००० टन द्रवरूप प्रोपेन आणि ब्युटेन म्हणजेच स्वयंपाकाच्या गॅसचा साठा आहे. मध्यपूर्वेतील तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या जहाजाने होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग काढत भारत गाठला. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने कतारमधील रास लाफान टर्मिनलकडून हा माल खरेदी केला होता. १३ मे २०२६ रोजी हे जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून पुढे रवाना झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com