
लखनौ होणार लक्ष्मणपुरी! शहराचे लक्ष्मणशी काय आहे कनेक्शन?
उत्तर प्रदेशात शहरे आणि रस्त्यांची नावे बदलण्याचा जो धडाका माजी मुख्यमंत्री मायावतीपासून सुरु झाला होता, तो त्यानंतर अखिलेश यादव आणि आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या काळातही सुरु आहे. मग ते अलाहबादचे नाव बदलून प्रयागराज करणे असेल किंवा फैजाबाद जिल्ह्याचे नाव अयोध्या करणे. योगी यांना नाव बदलण्याचा फाॅर्म्युल्याचा बराच फायदा झाला आहे. त्यांच्या प्रस्तावांना केंद्र आणि जनतेकडून मान्यताही मिळाली आहे. मात्र आता ज्या शहराचे नाव बदलण्याची चर्चा सर्वाधिक सुरु आहे, त्यात उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ (Lucknow) सर्वात वर आहे.
लखनौचे नाव बदलण्याची चर्चा केव्हा सुरु झाली?
या आठवड्यात सोमवारी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या एका ट्विटने लखनौचे नाव बदलण्याच्या चर्चेला उधाण आले. वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लखनौला आल्यावर योगी यांनी ट्विट केले होते, की शेषावतार भगवान श्री लक्ष्मणजी की पावण नगरी लखनौत तुमचे हार्दिक स्वागत व अभिनंद ! या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींबरोबर स्वतःची आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचा एक फोटोही पोस्ट केले होते. (Lucknow And Laxman Connection Know Everything About Laxmanpuri)
हेही वाचा: PHOTO : योगींच्या राज्याभिषेकासाठी लखनौ झालं भगवंमय
योगी यांच्या या ट्विटनंतर चर्चेला उधाण आले, की मुख्यमंत्र्यांनी लखनौला लक्ष्मणनगरी संबोधले आहे आणि त्यामुळे शहराचे नाव कधीही बदलू शकते. योगी यांच्या ट्विटनंतर हॅशटॅग लक्ष्मणपुरी जबरदस्त ट्रेंड झाला. अशा स्थितीत सर्व लोकांच्या मनात हाच प्रश्न आहे, की शेवटी भगवान लक्ष्मणचा लखनौचा काय संबंध आहे? नाव बदलण्याच्या मागे तर्क काय आहे?
लखनौला लक्ष्मणनगरी म्हणण्यामागे भाजपचा काय आहे दावा?
भाजप नेत्यांनी अनेक प्रसंगी लखनौचे नाव बदलून भगवान लक्ष्मण यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांची मागणी लखनौचे नाव लक्ष्मणनगरीऐवजी लक्ष्मणपुरी आहे. २०१८ मध्ये भाजपचे वरिष्ठ नेते कलराज मिश्रा, जे सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत, त्यांनी मागणी केली होती, की लखनौचे नाव बदलून लक्ष्मणपुरी करावे. त्यांची ही मागणी भाजप नेते लालजी टंडन यांच्या 'अनकहा लखनऊ' पुस्तकानंतर केली होती. टंडन यांनी या पुस्तकात भगवान लक्ष्मण आणि लखनौ दरम्यानचे पौराणिक कनेक्शन सांगितले होते.
हेही वाचा: Gyanvapi Mosque| ग्यानवापी मशिद कोणी बांधली, आताच वाद का सुरु झाला?
टंडन यांनी आपल्या पुस्तकात दावा केला, की लखनौला या पूर्वी लक्ष्मणपूर आणि लक्ष्मणवती या नावाने ओळखले जात होते. मात्र त्यानंतर त्यास लखनौती आणि लखनपूरही म्हटले जाऊ लागले. बदलांबरोबर तिला इंग्रजीत लखनौ म्हटले गेले. भाजप नेत्याचा दाव्यानुसार लखनौचा इतिहास वैदिक काळापासून आहे. मग पुन्हा रामायण काळ ही आला. जेव्हा भगवान लक्ष्मणने लक्ष्मणपुरीची स्थापना केली. टंडन यांचा दावा आहे, की त्या वेळच्या लक्ष्मण टेकडी काळाबरोबर विस्मृतीत गेली आणि आता त्या ऐतिहासिk टेकडीकडे केवळ टेकडी मशिदीशी जोडून पाहिले जाते.
लक्ष्मण टेकडे खोदण्याची मागणी
पुस्तकात म्हटले आहे, की जुने लखनौ लक्ष्मण टेकडीजवळ वसवले गेले होते. मात्र आज या लक्ष्मण टेकडीचे नाव पूर्णपणे विसरले गेले आणि आता त्याचे नाव पूर्णपणे पूसण्यात आले आहे. आता या स्थळाला टेकडीवाली मशिद म्हणून ओळखले जाते. लालजी टंडन यांच्या दाव्याचे समर्थन शहरातील एक पुरातत्त्व शास्त्रज्ञ डीपी तिवारी यांनीही केले होते. रामायणाच्या उत्तरकांडचा उल्लेख करत ते म्हणाले होते, की यात असे अनेक पुरावे आहेत, त्यात स्पष्ट होते की भगवान लक्ष्मण गोमती नदी ओलांडत लक्ष्मण टेकडीपर्यंत आले होते. तिवारी यांच्यानुसार, जर लक्ष्मण टेकडीवर ( जेथे औरंगजेबानंतर मशिद बांधली) पुन्हा खोदकाम झाल्यास लक्ष्मणशी संबंधित अनेक पुरावे समोर येऊ शकतात.
हेही वाचा: "पवार बोलतात ते..." Open mike मध्ये जलील यांनी घेतली फिरकी
आणखीन काय ?
लालजी टंडन यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर भाजपने टेकडीवाली मशिदीच्या बाहेर भगवान लक्ष्मणची एक मूर्ती ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. लखनौ महानगरपालिकेने या संबंधित प्रस्ताव पारित केले होते. मात्र विरोधी पक्ष आणि अल्पसंख्यांक नेत्यांनी त्यास विरोध केला होता. मुस्लिम नेते म्हणाले होते, की मशिदीबाहेर मूर्तीने त्यांच्या नमाज पठाणात बाधा येईल, कारण इस्लाममध्ये प्रतिमेसमोर नमाज पठण होऊ शकत नाही. मात्र या वर्षी १२ मे रोजी लखनौ महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाहिर केले होते, की शहरात पुढील महिन्यापासून लक्ष्मणची १५१ फुट उंच प्रतिमेचे निर्माण सुरु होईल. लखनौच्या महापौर संयुक्ता भाटिया म्हणाल्या की लक्ष्मणची मूर्ती गोमती नदीच्या काठी हनुमान सेतू मंदिराजवळील झुलेलाल वाटिकेत लावले जाईल. या मूर्तीजवळ लक्ष्मण प्रेरणा कुंज नावाची गॅलरीही उभारली जाईल. यात भगवान लक्ष्मणची जीवनकथा आणि त्यांच्या बलिदानांविषयी माहिती दिली जाईल.
Web Title: Lucknow And Laxman Connection Know Everything About Laxmanpuri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..