
Police and family members in shock after a 13-year-old Lucknow boy ended his life following a ₹14 lakh loss in Free Fire online game.
esakal
Summary
लखनऊमध्ये १३ वर्षांच्या मुलाने फ्री फायर गेममध्ये १४ लाख गमावल्याने टोकाचे पाऊल उचलले
वडिलांनी शेत विकून घर बांधण्यासाठी ठेवलेले पैसे मुलाने ऑनलाईन गेममध्ये खर्च केले.
रागावण्याच्या भीतीने मुलाने खोलीत गळफास घेऊन जीवन संपविले.
उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये फ्री फायर या ऑनलाईन गेमिंगमध्ये लाखो रुपये गमावल्याने एका १३ वर्षांच्या मुलाने जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घर बांधण्यासाठी त्याच्या वडिलांनी शेत विकल्यानंतर बँकेत ठेवलेले १४ लाख रुपये त्याने या गेममध्ये गमावले. यामुळे तो घाबरला होता. कुटुंबातील सदस्य रागावण्याचे भीतीने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.