PM मोदींच्या कार्यक्रमात रचला होता कट, PFI च्या सदस्याला लखनौमधून अटक I Narendra Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

पाटणाच्या पोलिस अधीक्षकांनी पत्र लिहून आरोपीला अटक करण्यात मदत मागितली होती.

PM मोदींच्या कार्यक्रमात रचला होता कट, PFI च्या सदस्याला लखनौमधून अटक

लखनौ : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (Popular Front of India PFI) सक्रिय सदस्य नुरुद्दीन जंगी (Nooruddin Jangi) उर्फ ​​वकील नुरुद्दीन याला एटीएस (ATS) आणि बिहार पोलिसांच्या (Bihar Police) संयुक्त पथकानं आलमबाग येथून अटक केलीय. नुरुद्दीन आणि त्याचे सहकारी बिहारमध्ये पंतप्रधानांच्या (Narendra Modi) प्रस्तावित दौऱ्याच्या कार्यक्रमात अडथळा आणण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणही दिलं जात होतं.

एडीजी एटीएस नवीन अरोरा यांनी सांगितलं की, पाटणाच्या पोलिस (Patna Police) अधीक्षकांनी पत्र लिहून आरोपीला अटक करण्यात मदत मागितली होती. बिहार पोलिसांचं एक पथक लखनौला आलं होतं. पथकानं आरोपींची माहिती शेअर केली. यानंतर एटीएसनं नुरुद्दीनला आलमबागमधील मवैया रेल्वे स्थानकाजवळून ताब्यात घेतलं. नुरुद्दीन चारबाग इथं राहत होता.

हेही वाचा: पाकिस्तान : कराचीत IndiGo विमानाचं Emergency Landing

चौकशीदरम्यान आरोपीनं सांगितलं की, 2015 मध्ये तो पीएफआय दरभंगा जिल्हा अध्यक्ष सनाउल्लाहच्या संपर्कात आला होता. त्यानंतर तो पीएफआय आणि एसडीपीआयमध्ये सामील झाला आणि तेव्हापासून नुरुद्दीन सक्रिय सदस्य आहे. 2020 मध्ये नुरुद्दीननं SDPI च्या बॅनरखाली दरभंगा विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. त्यानंतर आरोपीला सहाशे मतं मिळाली. आरोपीनं सांगितलं की, त्यानं 2017 मध्ये सीएम लाॅ कॉलेज, दरभंगा येथून एलएलबीची पदवी घेतली होती.

Web Title: Lucknow City Pfi Member Arrested In Lucknow On Charges Of Conspiracy In Pm Narendra Modi Program Uttar Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..