पाकिस्तान : कराचीत IndiGo विमानाचं Emergency Landing; शारजाहून हैदराबादला येत होतं विमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indigo plane emergency landing in karachi

दोन आठवड्यांत कराचीमध्ये भारतीय विमानाचं हे दुसरं आपत्कालीन लँडिंग आहे.

पाकिस्तान : कराचीत IndiGo विमानाचं Emergency Landing

इंडिगो विमानाचं (IndiGo Aircraft) पाकिस्तानातील कराची (Pakistan Karachi) इथं आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आलं. हे विमान शारजाहून हैदराबादला जात होतं, असं सांगण्यात येतंय. प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडीमुळं विमान उतरवण्यात आलंय. तांत्रिक बिघाडाची माहिती मिळाल्यानंतर, क्रू मेंबर्सनी (Crew members) विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांना दुसऱ्या विमानानं हैदराबादला आणलं जाणार आहे. दोन आठवड्यांत कराचीमध्ये भारतीय विमानाचं हे दुसरं आपत्कालीन लँडिंग आहे. इंडिगो एअरलाइन्सनं (Indigo Airlines) सांगितलं की, 'शारजाह-हैदराबाद (Sharjah-Hyderabad) फ्लाइटच्या पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली. यानंतर खबरदारी म्हणून विमान कराचीच्या दिशेनं वळवण्यात आलं. सध्या प्रवाशांना हैदराबादला आणण्यासाठी कराचीला जादा विमानाची व्यवस्था करण्यात आलीय.'

हेही वाचा: Rampur : राष्ट्रीय महामार्गावरील बस-ट्रकच्या भीषण अपघातात 5 ठार, 46 जण जखमी

यापूर्वी स्पाईसजेटच्या विमानात (Spicejet Aircraft) बिघाड झाल्यानंतर 5 जुलै रोजी कराचीमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं होतं. स्पाइसजेटचं हे विमान दिल्लीहून दुबईला जात होतं. या बिघाडानंतर विमानाला पाकिस्तानातील कराची इथं उतरावं लागलं. स्पाईसजेटच्या दुसऱ्या विमानानं प्रवाशांना दुबईला नेण्यात आलं. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी जयपूरमध्ये इंडिगो विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. इंजिनला कंपन आल्यानंतर हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

Web Title: Indigo Plane Emergency Landing In Karachi Flight Going From Sharjah To Hyderabad Indigo Airlines

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..