

Uttar Pradesh
esakal
उत्तराखंड राज्याला स्वत:ची ओळख आहे. देशाची देवभूमी म्हणून ही हे राज्य ओळखले जाते. उत्तराखंड महामंडळाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त लखनऊमध्ये उत्तराखंड महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी महामंडळाच्या सदस्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची निवासस्थानी भेट घेतली.
महामंडळाचे अध्यक्ष हरीशचंद्र पंत यांनी मुख्यमंत्री योगींना महामंडळाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित उत्तराखंड महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केले. मुख्यमंत्री योगींनी या निमंत्रणास संमती दिली आहे. लवकरच या महोत्सवाला सुरूवात होणार आहे.