Gosaiganj Incident : भगवा दुपट्टा घालून मांसाहार केल्याने तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. लखनऊमधील गोसाईगंज परिसरातील एका ढाब्यावर हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. नरेंद्र सिंह असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.