esakal | Lucknow: गृहनिर्माण योजना ‘सप’मुळे रेंगाळली
sakal

बोलून बातमी शोधा

Samajwadi Party

लखनौ : गृहनिर्माण योजना ‘सप’मुळे रेंगाळली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखनौ : तत्कालिन समाजवादी पक्षाच्या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लक्ष्य केले. सप सरकारला राज्यात गरीबांसाठी घरे बांधण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे, केंद्रीय गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीत ‘सप’ने अडथळे आणले आणि ही योजना रेंगाळली, असा आरोप मोदी यांनी केला.

ते म्हणाले, की २०१७ पूर्वी पंतप्रधान आवास योजनेतंर्गत उत्तर प्रदेशात १८ हजारांपेक्षा अधिक घरांना मंजुरी देण्यात आली. मात्र, या योजनेत अवघी १८ घरेही बांधली गेली नाहीत. याउलट योगी आदित्यनाथ सरकारने या योजनेतंर्गत नऊ लाख घरे बांधली तसेच आणखी १४ लाख घरांचे बांधकाम सुरू आहे.

हेही वाचा: "शेतकऱ्यांना चिरडणारे वाहन आपलेच पण..."; केंद्रीय मंत्र्याची कबुली

पंतप्रधानांच्या हस्ते ७५ हजार लाभार्थ्यांना घरकुलांच्या चाव्या डिजिटल पद्धतीने देण्यात आल्या. या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. केंद्र सरकारने तीन कोटी गरीब कुटुंबांना लखपती केल्याचा दावाही त्यांनी केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित परिषद व प्रदर्शनाचे उद्‌घाटनही पंतप्रधांनांनी केले. लखनौतील इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये आगमन झाल्यानंतर मोदी यांच्यासह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, राज्यपाल आनंदीबेन पटेल आदींनी प्रदर्शनाला भेट दिली. अयोध्येच्या बृहत आराखड्याबाबतही त्यांनी चर्चा केली.

नऊ लाख घरांत दिवे लावा!

उत्तर प्रदेश सरकारच्या दिवाळीत अयोध्येत साडेसात लाख दिवे लावण्याच्या योजनेचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात केला. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत बांधण्यात आलेल्या राज्यातील नऊ लाख घरांत दिवाळीनिमित्त प्रत्येकी दोन दिवे लावण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केले.

loading image
go to top